घरताज्या घडामोडीOmicron Variant: ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी ICMR कडून आरटी-पीसीआर किटची निर्मिती, २ तासात अहवाल...

Omicron Variant: ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी ICMR कडून आरटी-पीसीआर किटची निर्मिती, २ तासात अहवाल मिळणार

Subscribe

देशात ओमिक्रॉनच व्हेरियंटचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आयसीएमआर (ICMR) च्या वैज्ञानिकांकडून ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी आरटीपीसीआरची निर्मिती केली जाणार आहे. ओमिक्रॉनच्या चाचणीसाठी ही किट वैद्यकीय संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. जर एखादा रूग्णाला कोरोना विषाणूची लागण झाली असेल किंवा त्याला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली असेल तर त्याची चाचणी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या किटच्या माध्यमातून केवळ दोन तासांमध्ये ओमिक्रॉनची लागण झाली असल्यास त्याचा अहवाल समोर येणार आहे.

ओमिक्रॉन टेस्टिंगसाठी किट

आसामचे एक वैज्ञानिक डॉ. विश्वज्योति बोरकाकोटी यांनी सांगितलं की, वैज्ञानिकांच्या एका टीमने किटची निर्मिती केली आहे. या किटमध्ये संशोधन करण्यासाठी हायड्रोलिसिस आरटी-पीसीआर (RT-PCR) सिस्टमच्या पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यामुळे दोन तासांमध्ये ओमिक्रॉनच्या संक्रमणाचा अहवाल समोर येऊ शकतो. आता ओमिक्रॉन व्हेरियंटची लक्षणं आढळल्यास त्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे शास्त्रज्ञांनी नवीन किटची निर्मिती केली असून फक्त दोन तासांमध्ये त्याचा अहवाल समोर येणार आहे.

- Advertisement -

लवकरच बाजारात होणार उपलब्ध

लॅबमध्ये चाचणी दरम्यान या किटचे १०० टक्के निकाल अचूक आले आहेत. याचं परिक्षण पुण्यातील नॅशनल व्हॉयरोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये केलं जात आहे. या किटला ICMR च्या डिजाईननुसार तयार केलं जाणार आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट टेस्टिंग किट बनवण्याची जबाबदारी कोलकाता येथील बायोटेक कंपनी जीसीसी बायोटेकला देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात किट बाजार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

देशात दिवसागणिक ओमिक्रॉनचे रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे किटची निर्मिती करण्यात आली आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्ये रूग्णांची संख्या ३३ च्या वर पोहोचली आहे. दुसरीकडे इतर देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरियंटवर बूस्टर डोसचा मोठा प्रभाव, शरीरात अँटीबॉडी वाढण्यास मदत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -