नात्यातील दुराव्यात पुरुषाला बलात्काराचा आरोपी मानता येणार नाही, केरळ उच्च न्यायालयाचे मत

if there is a rift in the relationship a man cannot be accused of rape kerala high court

मीडियामध्ये अनेकदा नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत असतात. यात अनेकदा लाईफ पार्टनरकडून बलात्काराचे आरोप होतात. त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनपासून ते नंतर न्यायालयापर्यंत जाऊन पोहचते. अशाच प्रकारच्या एका जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान केरळ उच्च न्यायालयाने नात्यातील दुराव्याबाबत एक महत्त्वपूर्ण मत नोंदवले आहे. उच्च न्यायालयाने म्हटले की, जर जोडप्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर त्या पुरुषावर बलात्काराचा आरोप करत येऊ शकत नाही. जर संबंध जुळले नाही तर त्या पुरुषाला बलात्काराच्या आरोपातील दोषी मानता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. नात्यातील या दुराव्याबाबत न्यायालय शुक्रवारी निकाल देऊ शकतात. केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी हे निरीक्षण नोंदवले आहे.

यावर न्यायमूर्ती म्हणाले की, कोणतेही नातेसंबंध वेळेनुसार विकसित होत असतात, आजकाल तरुण आणि प्रौढांचे रोमँटिक नातेसंबंधांकडे पाहण्याचे भिन्न दृष्टीकोन आहे, परंतु नातेसंबंध सुरळीत सुरु नसेल तर पुरुषावर बलात्काराचे आरोप होऊ शकत नाही किंवा त्याला याप्रकरणात आरोपी मानले जाऊ शकत नाही.

एका वृत्तानुसार, उच्च न्यायालयाने पुढे टिप्पणी केली की, नातेसंबंधातील या बदलामुळे जोडप्यांचे एकमेकांसोबत असलेले संपुष्टात येत दोघांनीही इतरांशी लगन केल्यानंतर बलात्काराच्या आरोपांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की, कोणीही आपल्या जोडीदाराला लग्नाच्या खोटे आमिष दाखवत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जावे.

केरळ उच्च न्यायालयात नवनीत एन नाथ यांच्या प्रकरणी ही सुनावणी सुरू होती. एका सहकाऱ्याने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीच्या आधारे नवनीतला अटक करण्यात आली. नवनीत नाथ यांच्यावर संबंधित महिलेने असे आरोप केले की, नवनीत नाथ याचे या महिलेसोबत सुमारे ४ वर्षांपासून संबंध होते. पण नंतर नाथने दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, जेव्हा महिलेला हा प्रकार समजला तेव्हा ती हॉटेलमध्ये नाथच्या होणाऱ्या पत्नीला भेटली.

यावेळी महिलेने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे याप्रकरणी चौकशीदरम्यान महिलेने पोलिसांना आपले म्हणणे मांडले, त्यानंतर नवनीत एन नाथला अटक करण्यात आली. नाथ यांची बाजू मांडणारे अधिवक्ता रमेश चंदर यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, याचिकाकर्त्याला महिलेशी लग्न करायचे आहे. त्यांच्यात अनेक वर्षांपासून शारीरिक संबंध होते. हे शारीरिक संबंध पूर्णपणे दोघांच्या संमतीने होते,

यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या वकिलाने सांगितले की, दोघांमधील शारीरिक संबंध आता खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. लग्नाचे आश्वासन दिल्याने हे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. यावेळी संबंधित पीडित महिलेच्या वकिलांनी नवनीतच्या जामिनाला विरोध केला. मात्र, या प्रकरणात लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी घेतली आहे का, हेही पाहावे लागेल, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.


किरकोळ बाजारात खाद्यान्न तेलांच्या किमती घसरल्या; टोमॅटो, डाळीही स्वस्त