घरदेश-विदेशImran Khan : अल कादिर ट्रस्ट प्रकरणी इम्रान खान यांना जामीन मंजूर

Imran Khan : अल कादिर ट्रस्ट प्रकरणी इम्रान खान यांना जामीन मंजूर

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना शुक्रवारी (12 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मोठा दिलासा मिळाला आहे. अल कादिर ट्रस्ट प्रकरणी न्यायालयाने इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर  करण्यात आला आहे.

इम्रान खान यांनी पंतप्रधान असताना अल कादिर ट्रस्ट अंतर्गत विद्यापीठाला कोट्यावधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी पीटीआय पक्षाच्या इतर नेत्यांचाही या ट्रस्टशी संबंध आहे. हे प्रकरण त्यांचे सरकार आणि प्रॉपर्टी टायकून यांच्यातील कथित भागिदारीशी संबंधित आहे. यामुळे पाकिस्ताच्या अर्थव्यवस्थेला तब्बल 50 अब्ज रुपयांचे नुकसान झाले होते. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा हे दोघेच अल कादिर विद्यापीठाचे विश्वस्त आहेत. सुमारे 90 कोटींच्या या विद्यापीठात 6 वर्षात केवळ 32 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे म्हटले जाते. खान यांच्यावर एकूण 108 गुन्हे दाखल आहेत. पण या प्रकरणी न्यायालयाने इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, इम्रान खान यांना गुरूवारी इस्लामाबाद हायकोर्टाने तोशाखाना प्रकरणी सुनावणीला स्थगिती दिली आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने फौजदारी खटला चालवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने इम्रान खान यांच्यावर कोणताही फौजदारी खटला चालणार नाही, असे सांगितले. इम्रान खान न्यायालयात म्हणाले  की, त्यांच्याविरोधात 145 गुन्हे दाखल आहेत. एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे त्यांना अटक करण्यात आली. त्याचवेळी, मुख्य न्यायमूर्ती उमर अता बंदियाल, न्यायमूर्ती मुहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अतर मिनाल्ला यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आवारातून त्याच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, त्याच्याविरुद्धची कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

अल कादिर ट्रस्ट (Al Qadir Trust case) प्रकरणात इम्रान खान यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणांमध्ये जामीन घेण्यासाठी इम्रान खान हे इस्लामाबाद उच्च न्यायालयात आले असताना नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) त्यांना न्यायालयाच्या आवारातून अटक केली होती. त्यावर देखील न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. इम्रान खान यांना न्यायालयाच्या आवारातून अटक करणे, हे अपमानजनक असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. उच्च न्यायालय किंवा अन्य न्यायालयातून आरोपीला अटक करता येत नाही. तुम्ही न्यायालयाचा अनादर करू शकत नाहीत, असे न्यायालयाने एनएबीला सुनावले. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर पाकिस्तान सरकार आणि लष्कर दोघेही बॅकफूटवर आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, इम्रान खान यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांना कडक पोलीस बंदोबस्तात पोलीस लाइन गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते. काल रात्री इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी  कोठडीदरम्यान आपल्याला लाठीने मारहाण केल्याचे आरोप केले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -