घरCORONA UPDATEलॉकडाऊन- घरात बसून चिडचिड होतेय का? सगळ्यांचाच कंटाळा आला आहे का? मग...

लॉकडाऊन- घरात बसून चिडचिड होतेय का? सगळ्यांचाच कंटाळा आला आहे का? मग हे वाचा

Subscribe

घरात बसून कंटाळला आहात का? केव्हा सगळ सुरळीत होईल याची चिंता वाटतेय का ? पण जरा थांबा ही बातमी तुमच्यासाठीच आहे. संपूर्ण जग ज्यावेळी नवीन वर्षांच्या स्वागताची तयारी करत होते त्यावेळी एकटा चीन मात्र कोरोना व्हायरसशी झुंज देत होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता जगातील दोनशेहून अधिक देश कोरोनाचा सामना करत आहेत. तर चीन पूर्वपदावर येत आहे. यातून एकच संदेश घेण्यासारखा आहे तो म्हणजे कुठलीच परिस्थिती कायम राहात नाही. यामुळे उगाच टेन्शन घेऊ नका. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊनही कायम राहणार नाहीये. हे स्व:ताला सांगा आणि लॉकडाऊनचा हा वेळ मन रमेल त्या कामात घालवा. असा सल्ला तज्ज्ञमंडळी देत आहेत.

सध्या जगातील जवळ जवळ सगळ्याच नागरिकांची अवस्था सारखीच आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना घरातच अडकून राहावे लागत आहे. चारभिंतीत बंदिस्त व्हावे लागल्याने प्रत्येक व्यक्तीमध्ये निराशेची भावना वाढीस लागली आहे. त्यातही नोकरी व कामानिमित्त सतत घराबाहेर असणाऱ्या व्यक्तींच्या मनात लॉकडाऊन ही शिक्षाच असल्याचे विचार घोळू लागल्याचे एम्सचे वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर स्पंदन ठाकर यांनी सांगितले आहे. ल़ॉकडाऊनचा परिणाम हा देशातील अर्थव्यवस्थेवरही होणार असल्याने काहीजणांना आपली नोकरी राहील की जाईल ही चिंता सतावू लागली आहे. हाती कामच नसल्याने रिकाम्या वेळेत लोक सकारात्मक विचार करण्यापेक्षा नकारात्मक विचारांकडे अधिक वळत असल्याचे दिल्लीच्या डॉक्टर सुजाता आनंद यांनी सांगितले आहे. यामुळेच सतत चिडचिड होणे, काहीच नकोसे वाटणे कोणाशीही बोलण्याची इच्छा न होणे. तास न तास अंथरुणात पडून राहणे अशा कृती लोक करत आहेत. हे मास एंझायटीचे mass anxiety संकेत आहेत. जे भविष्यासाठी चिंताजनक ठरु शकते असा इशारा मनोविकारतज्ज्ञांनी दिला आहे. तर काहीजणांना आपल्यालाही कोरोना होईल ही भीती सतावत आहे. ज्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होत आहे. यामुळे असे नकारात्मक विचार न करता उद्या येणाऱ्या चांगल्या परिस्थितीचा विचार करण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींनी दिला असून लॉकडाऊनमधील वेळ हा निराशेत न घालवता लॉकडाऊननंतर करावयाच्या तरतूदींची योजना करण्यासाठी घालवा कुटुंबाला वेळ द्या आणि सकारात्मक राहा असा सल्ला दिल्लीतील एम्स रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -