घरताज्या घडामोडीIndependence Day 2022 : पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधानांना 'अटॅग' या स्वदेशी तोफेतून...

Independence Day 2022 : पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधानांना ‘अटॅग’ या स्वदेशी तोफेतून सलामी

Subscribe

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022). या निमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच 21 तोफांच्या सलामीत स्वदेशी तोफांचा समावेश करण्यात येणार आहे.

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022). या निमित्ताने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच 21 तोफांच्या सलामीत स्वदेशी तोफांचा समावेश करण्यात येणार आहे. आतापर्यंत दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश पाउंडर गनमधून 21 तोफांची सलामी दिली जात होती. मात्र यंदा पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधानांना ‘अटॅग’ या स्वदेशी तोफेतून सलामी दिली जाणार आहे. (Independence Day 2022 PM narendra modi delhi Red Fort)

यंदा लाल किल्ल्यावर 21 तोफांच्या सलामीमध्ये 6 ब्रिटिश पाउंडर तोफांसह देशी अटाग तोफांचा समावेश करण्यात आला आहे. DRDO द्वारे टाटा आणि भारत-फोर्ज कंपन्यांच्या सहकार्याने अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम विकसित करण्यात आली आहे.

- Advertisement -

155 x 52 कॅलिबरच्या या ATAGS गनची रेंज सुमारे 48 किमी आहे. ती लवकरच भारतीय लष्कराच्या तोफखान्याचा भाग होणार आहे. दरम्यान, भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजवंदनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधन करत आहेत. विशेष म्हणजे मोदी सलग नवव्यांदा संबोधीत करत आहेत.

15 ऑगस्ट 1947 रोजी याच दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपला भारत 75 व्या अमृत महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण देशासाठी ‘राष्ट्रीय सुट्टी’ म्हणून पाळला जातो. त्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इतरांना ओझे वाटणारी भारतातील विविधता हा शक्तीचा अतूट पुरावा; पंतप्रधान मोदींच्या देशावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -