India Corona Update: कोरोनामुळे देशात आज 1733 रुग्णांचा मृत्यू, सलग दुसऱ्या दिवशी मृतांचा आकडा 1 हजार पार

coronavirus update india records 4184 new cases and 104 death in last 24 hours active cases stands at 44488
Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट; 4184 नवे रुग्ण, 104 मृत्यू

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. भारतात गेल्या 24 तासात 1,61,386 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,81,109 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत 3.4 टक्क्यांची घसरण झाली आहे, याचदरम्यान 1733 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मृतांच्या आकडा एक हजार पार आहे. यापूर्वी मंगळवारी देखील 1192 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता.

भारतात कोरोना रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असली तरी सलग पाच दिवसांपासून मृतांचा आकडा वाढतोय. त्यामुळे ही कुठेतरी चिंताजनक बाब आहे. यापूर्वी मंगळवारी देशात 1192 आणि सोमवारी 959 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी रविवारी 893 तर शनिवारी 871 रुग्णांचा मृत्यू झाला.

बुधवारी 1.61 लाख रुग्ण आढळले. यापूर्वी मंगळवारी 1.68 लाख, सोमवारी 2.09 लाख प्रकरणे नोंदवली गेली होती. त्याच वेळी, रविवारी 2,34,281 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. शनिवारी कोरोनाच्या 235532 रुग्णांची नोंद झाली. कालच्या तुलनेत 3.4% कमी प्रकरणे होती.

आत्तापर्यंत देशात 3,95,11,307 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट 94.91 टक्के नोंदवण्यात आला आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट हा 9.26 टक्के झाला आहे. आता देशात अॅटिव्ह रुग्णांची संख्या 16,21,603 झाली असून हा दर 3.90 टक्के झाला आहे. देशात गेल्या 24 तासात 57,42,659 कोरोनाविरोधी लसीकरण झाले आहे. तर आत्तापर्यंत 1,67,29,42,707 लसीचे डोस देण्यात आले आहे.

‘या’ राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण 

भारतातील 5 राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. केरळमध्ये सर्वाधिक 51,887 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी, तामिळनाडूमध्ये 16,096, महाराष्ट्रात 14,372, कर्नाटकमध्ये 14,366 आणि गुजरातमध्ये 8,338 रुग्ण नोंदवले गेले आहेत. या 5 राज्यांमध्ये, देशात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 65.1 टक्के रुग्ण नोंदवण्यात आलेत. त्याच वेळी, एकट्या केरळमध्ये 32.15 टक्के रुग्ण नोंदवण्यात आलेत.


एअरफोर्समध्ये आता महिला फायटर पायलट होणार परमनंट, संरक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय