घरCORONA UPDATEभयंकर! भारत इटलीच्या वाटेवर , संसर्गाचा वेग सारखाच

भयंकर! भारत इटलीच्या वाटेवर , संसर्गाचा वेग सारखाच

Subscribe

कोरोना व्हायरसचे थैमान जगभरात सुरू असून युरोपियन देशांमध्ये भयंकर परिस्थिती उद्भवली आहे. चीन, इराण, नंतर इटलीत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पण कोरोना संसर्गाचा वेग पाहता भारत महिन्याभरानंतर इटलीच्या मार्गावर जाईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत भारतात ५ हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा १५० पर्यंत पोहचला आहे.

वर्ल्ड मीटरनुसार भारतातही इटलीच्या वेगाने कोरोनाची लागण होत आहे. भारताला इटलीतील कोरोनाच्या आकड्यापर्यंत पोहचायला अवघा महिनाभराचा कालावधी लागेल. तसेच मार्च महिन्यातील आकडा पाहता इटलीतील कोरोनाचा रु्ग्णाचा आकडा १५७७ होता. तर ४१ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

सहा एप्रिल रोजी भारतात कोरोना रुग्णांचा आकडा ४७७८ वर पोहचला होता. तर १३६ जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत इटलीत ६ मार्चचा आकडा पाहता सध्या तिथे ४६३६ कोरोना रुग्ण असून १९७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या सध्याच्या भारतातील वाढणाऱ्या कोरोना रुग्णाच्या संख्येशी मिळतीजुळती आहे. इटलीत एक मार्चला ५७३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर १२ जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे भारतात एक एप्रिल रोजी ६०१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर २३ जणांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही देशांची कोरोना संबंधित माहिती पाहता मृत्युदर जवळजवळ सारखाच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. १ मार्चला इटलीचा मृत्यूदर ३३.०१ टक्के एवढा होता. तर १ एप्रिलला भारतात कोरोनाचा मृत्यूदर २८.१६ टक्के होता.

तसेच भारतात कोरोना टेस्टकिटची कमतरता असल्याने कोरोना रु्ग्णा्ंचा आकडा कमी दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतात एक लाख लोकांपैकी अवघ्या ६.५ लोकांची टेस्ट करण्यात आली आहे. यामुळे भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -