Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE कोरोनाचा उद्रेक! देशात २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे रुग्ण,...

कोरोनाचा उद्रेक! देशात २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे रुग्ण, ३६४५ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा उद्रेक होत असून दररोज रुग्णसंख्या उच्चांक पातळी गाठत आहे. भारतात अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध असतानाही वाढणारी रुग्णसंख्या गंभीरबाब ठरत आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ७९ हजार २५७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर कोरोनामुळे तब्बल ३६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात वाढत्या रुग्णसंख्येबरोबर वाढणाऱ्या मृतांची संख्या रोखणे देशासमोर मोठे आव्हान ठरत आहे. तर गेल्या २४ तासांत २ लाख ६९ हजार ५०७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची आकडेवारी आज आरोग्य मंत्रालयाकडून आली आहे.

- Advertisement -

आज देशात ३ लाख ७९ हजार २५७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे देशातील आत्तापर्यंतच्या कोरोना रुग्णसंख्येने १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ टप्पा गाठला आहे. तर गेल्या २४ तासांत ३६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात आजही सर्वाधिक कोरोनाचा मृतांची नोंद झाली आहे. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६९ हजार ५०७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर आत्तापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या ३० लाख८४ हजार ८१४ अॅक्टिव्ह रुग्ण असून १५ कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे.

 

- Advertisement -