Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE India Corona Update: देशात बाधितांसह मृतांचा आकडा घटला; २४ तासात ३८,१६४ नवे...

India Corona Update: देशात बाधितांसह मृतांचा आकडा घटला; २४ तासात ३८,१६४ नवे रूग्ण, ४९९ मृत्यू

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कहर सुरू असताना गेल्या २४ तासात नव्या कोरोना बाधित रूग्णांसह कोरोनाने बळी जाणाऱ्यांच्या आकड्यात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात बाधितांचा आकडा हा ४० हजारांपार असल्याचे दिसत होते. मात्र दिलासादायक बाब म्हणजे रविवारी बाधितांच्या तुलनेत आज सोमवारी बाधितांची संख्या घटली असून देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार १६४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४९९ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यासह देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट देखील झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत असल्याने देशाची चिंता काहिशी दूर झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत एकूण ३८ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३ कोटी ११ लाख ४४ हजार २२९ वर पोहचली आहे.

- Advertisement -

देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ३ कोटी ११ लाखांच्यावर असली तरी सध्या देशात फक्त ४ लाख २१ हजार ६६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर देशात कोरोनाने बळी गेलेल्यांचा आकडा हा ४ लाख १४ हजारांवर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात ३ कोटी ३ लाख ८ हजार ४५६ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून ते घरी परतले आहेत.देशात आत्तापर्यंत ४० कोटी ६४ लाख ८१ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

 

- Advertisement -

ICMR ने दिलेल्या माहितीनुसार,देशात आतापर्यंत ४४ कोटी ५४ लाख २२ हजार २५६ इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी गेल्या २४ तासात १४ लाख ६३ हजार ५९३ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.


 

- Advertisement -