देशभरात २४ तासांत ९ हजार ९८३ नवे रुग्ण; २०६ कोरोनाबाधितांचा मृत्यू

देशभरात २४ तासांत ९ हजार ९८३ नवे रुग्ण आढळून आले असून २०६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

India reports highest single-day spike of 9983 new cases; 206 deaths in last 24 hours
देशभरात २४ तासांत ९ हजार ९८३ नवे रुग्ण

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २०६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ५६ हजार ६११ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख २५ हजार ३८१ अॅक्टिव्ह केसेस असून १ लाख २४ हजार ०९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७ हजार १३५ जणांचा मृत्यू झालेला आहे.

राज्यात ३००७ नवे रुग्ण

राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना रविवारी अचानक तब्बल ३००७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८५ हजार ९७५ वर पोहोचली आली आहे. त्याचप्रमाणे ९१ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३०६० झाली आहे. राज्यातील मृत्यू दर ३.५५ टक्क्यांवर आला आहे. रविवारी राज्यातील १९२४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून आजपर्यंत ३९ हजार ३१४ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४५.७२ टक्के एवढे आहे.

राज्यात रविवारी ९१ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यामध्ये मुंबई ६१, उल्हासनगर ५, मीरा भाईंदर ४, पालघर १, नाशिक १, पुणे ६, सोलापूर ८, कोल्हापूर २, जालना १, अकोला मनपा १ असे मृत्यू झाले आहेत. तसेच पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचा मुंबईत मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी ६४ पुरुष तर २७ महिला आहेत. ९१ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४६ रुग्ण आहेत तर ४१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत.


हेही वाचा – Corona Live Update: देशभरात २४ तासांत ९ हजार ९८३ नवे रुग्ण