घरCORONA UPDATEयंदा पावसाळी पिकनिकला मुकणार; पुण्यातील या पर्यटनस्थळांवर आणली बंदी

यंदा पावसाळी पिकनिकला मुकणार; पुण्यातील या पर्यटनस्थळांवर आणली बंदी

Subscribe

पावसाळा आला की पर्यटकांची पावले आपोआप पिकनिकसाठी सरसावतात. धबधबे, किल्ले त्यांना खुणावू लागतात. मात्र कोरोनाच्या सावटाखाली सध्या संपूर्ण जग लॉकडाऊन असताना राज्यातही मोठ्या प्रमाणात निर्बंध घातल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा पर्यटकांना पावसाळी पिकनिकचा आनंद लुटता येणार नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटनस्थळांवर बंदी घातली असून त्यामुळे पर्यटकप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

भूशी डॅमसह अनेक पर्यटनस्थळांवर बंदी 

पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पर्यटनस्थळांवर पर्यटकांना बंदी असल्याचे जाहीर केले आहे. पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस होतो. मावळ तालुक्यात भुशी धरण, लोणावळ्यातील विविध पॉईंट्स, गड-किल्ले, लेण्याद्री. तसेच मुळशी तालुक्यातील मुळशी धरण आणि ताम्हिणी घाट परिसर आणि हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण आणि गड-किल्ले परिसर आहेत. तर वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण आणि परिसरातही वर्षापर्यटनासाठी पुणे-मुंबईहून पर्यटक येतात. मुंबई, पुण्यासह बहुतांश जिल्हयातील पर्यटकांची पर्यटनासाठी या धरणांना पसंती असते. प्रत्येक वीकएण्ड आणि सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुण्यासह बहुतांश जिल्ह्यातील पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत पर्यटनाला बंदी कायम ठेवली आहे. या आदेशाचा कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनिहाय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

हेही वाचा –

MissionBeginAgain : पहिल्यात दिवशी बेस्ट व्यवस्थेचा फज्जा, प्रवाशांच्या रांगा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -