घरताज्या घडामोडीसंजय राऊतांची आजची पत्रकार परिषद रद्द, मात्र लवकरच रोखठोक बोलणार

संजय राऊतांची आजची पत्रकार परिषद रद्द, मात्र लवकरच रोखठोक बोलणार

Subscribe

संजय राऊत या पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या परंतु लता मंगेशकर यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवटा सुरु असल्यामुळे संजय राऊत यांनी आपली पत्रकार परिषद रद्द केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली पत्रकार परिषद रद्द केली असल्याची माहिती दिली आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी राज्यात आणि देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात करण्यात आला आहे. राष्ट्रीय दुखावटा सुरु असल्यामुळे पत्रकार परिषद रद्द करण्यात आली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेणार होते. मुंबईतील शिवसेना भवनात ही पत्रकार परिषद घेण्यात येणार होती. उत्तर प्रदेश आणि गोव्यात विधानसभा निवडणूक होत आहे. शिवसेना या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार देणार आहे. तसेच राज्यातील महापालिकेच्या निवडणुका, नागरिकांचे प्रश्न आणि विरोधकांच्या टीकेला संजय राऊतांकडून उत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. संजय राऊत या पत्रकार परिषदेत काय बोलणार? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या परंतु लता मंगेशकर यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवटा सुरु असल्यामुळे संजय राऊत यांनी आपली पत्रकार परिषद रद्द केली आहे.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पत्रकार परिषद रद्द केली असल्याची माहिती दिली आहे. “गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवटा सुरू आहे. आपण सगळेच शोकमग्न आहोत. मी ऊद्या (सोमवारी) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार होतो. तूर्त ती रद्द करण्यात आली आहे. लवकरच मी रोखठोक बोलेन” अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

सार्वजनिक सुट्टी जाहीर

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. लतादीदींच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा श्रद्धांजली वाहिली आहे. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

युग संपले – संजय राऊत

गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युग संपले असे ट्विट करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. एक सूर्य, एक चंद्र, एक लता आणि लतादीदी अमर रहे असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनाने राष्ट्रीय दुखवटा, राज्यात एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर, अधिसूचना जारी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -