घरताज्या घडामोडीIndian billionaires : कोरोना काळात भारतात अब्जाधीशांची संपत्ती दुप्पट, नव्या अब्जाधीशांचीही भर

Indian billionaires : कोरोना काळात भारतात अब्जाधीशांची संपत्ती दुप्पट, नव्या अब्जाधीशांचीही भर

Subscribe

भारतातील श्रीमंतांनी covid-19 च्या कठीण काळातही आपली संपत्ती दुप्पट करण्याची किमया केली आहे. तर दुसरीकडे गरीबांच्या अडचणीत मात्र आणखी भर पडली आहे. ग्लोबल ऑक्सफॅम डॅवोस अहवाल २०२२ नुसार ही माहिती समोर आली आहे. देशामध्ये एकुण ४० नव्या अब्जाधीशांची भर पडल्याची आकडेवारी अहवालातून समोर आली आहे. आता भारतातील अब्जाधीशांचा आकडा हा १०२ वरून १४२ इतका झाला आहे. अर्थव्यवस्थेमुळे देशातील श्रीमंत आणखी श्रीमंत झाले, तर गरीबांच्या संकटात आणखी भर पडल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे. (indian billionaires wealth double during covid-19 pandemic 40 new Indian billionaires added to list oxfam report)

देशामध्ये जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतानाच आरोग्य यंत्रणेवरही ताण पडत होता, अशाच कालावधीत या श्रीमंतांच्या आकडेवारीत भर पडली आहे. देशातील अब्जाधीशांकडे एकत्रित अशी ७२० डॉलर्स अब्ज इतकी संपत्ती आहे. देशातील गरीबांच्या ४० टक्के लोकसंख्येच्या संपत्तीपेक्षा ही संपत्ती अधिक आहे. ग्लोबल ऑक्सफॅम डॅवोस अहवाल सोमवारी प्रकाशित झाला. या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

जागतिक पातळीवर क्रिप्टो आणि कमोडिटीजच्या स्टॉकच्या किंमतीमध्ये वाढ झाली, तशीच वाढ ही संपत्तीतही झाली. जागतिक पातळीवर ५०० श्रीमंत अशा व्यक्तींच्या संपत्ती १ ट्रिलिअन डॉलर्स इतकी भर गेल्या वर्षभराच्या कालावधीत पडली. त्याचवेळी भारतात शहरी भागातील बेरोजगारीचा आकडा हा मे २०२१ मध्ये १५ टक्क्यांनी वाढला. त्यासोबतच अन्नसुरक्षेच्या बाबतीतही भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात सध्या फ्रान्स, स्विडन आणि स्वित्झर्लंड यापेक्षाही अधिक अब्जाधीश असल्याचा आकडा ऑक्सफॅमने जाहीर केला आहे.

भारतातील कर धोरण हे श्रीमंतांसाठी पूरक असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे भारतातील राज्यांनाही आर्थिकदृष्ट्या या गोष्टीचा फटका बसतो. महत्वाचे म्हणजे covid-19 च्या काळातही हा फटका बसला आहे. ऑक्सफॅमने सुचवलेल्या पर्यायानुसार भारत सरकारने १ टक्के इतका सरचार्ज हा श्रीमंतांना लावण्याची गरज व्यक्त केली आहे. देशातील १० अब्जाधीश श्रीमंत हे देशातील शिक्षणाची २५ वर्षांची जबाबदारी घेऊ शकतात असेही मत अहवालातून मांडण्यात आले आहे. कोरोनाच्या कालावधीत भारतातील ८४ टक्के घरांमध्ये उत्पन्नात घट झाल्याचा अनुभव आहे. ही गरीबीची परिस्थिती आफ्रिकेसारखी असल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे.

- Advertisement -

गरीब श्रीमंतांमधील दरी

ऑक्सफेमचे सीईओ अमिताभ बेहर यांनी स्पष्ट केले की, हा अहवाल असमानतेचे कडवे सत्य समोर आणतो. या असमानतेमुळेच प्रत्येक दिवशी २१ हजार लोकांना मृत्यूच्या दरीत ढकलतो आहे. दरदिवशी प्रत्येक चार सेकंदाला एका व्यक्तीला मृत्यू ओढावण्याचे हेच कारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

महिलांच्या रोजगारावर परिणाम

कोरोनाच्या काळात लैंगिक समानतेला हा ९९ वर्षांवरून १३५ वर्षे मागे ढकलण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. महिलांच्या रोजगारामध्ये सामुहिक उत्पन्नात २०२० वर्षात ५९.११ लाख कोटींचे नुकसान झाले. त्याआधी २०१९ मध्ये १.३ कोटी महिला कार्यरत होत्या.

भारतीय आणखी गरीब झाले

अहवालानुसार ४.६ कोटींहून अधिक भारतीय हे २०२० मध्ये आणखी गरीब झाले. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार हा आकडा जागतिक पातळीवर असणाऱ्या गरीबांच्या आकडेवारीच्या निम्मा इतका आहे. भारतात गरीब आणि वंचिंतांच्या तुलनेत श्रीमंतांना प्रोत्साहन देणाऱ्या अर्थव्यवस्थेचेच हे परिणाम असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -