घरताज्या घडामोडीमायक्रोसॉफ्टकडून नोकरकपात : २१ वर्षे जॉब करूनही डच्चू, भारतीयानं लिहिलं भावनिक पत्र

मायक्रोसॉफ्टकडून नोकरकपात : २१ वर्षे जॉब करूनही डच्चू, भारतीयानं लिहिलं भावनिक पत्र

Subscribe

मागील काही दिवसांपासून मायक्रोसॉफ्ट कंपनीनं नोकरकपातीचं सत्र सुरू केलं आहे. या कंपनीने मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत १० हजार लोकांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे पाच टक्के कर्मचारी कमी करण्याची मायक्रोसॉफ्ट कंपनीची योजना आहे. यावेळी २१ वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या एका भारतीय व्यक्तीला मायक्रोसॉफ्ट कंपनीने डच्चू दिला आहे. त्यानंतर त्या भारतीय व्यक्तीने सोशल मीडियावर एक भावनिक पत्र लिहिलं आहे.

भारतीय व्यक्तीने काय म्हटलंय पत्रात?

- Advertisement -

आज माझं मायक्रोसॉफ्ट कंपनीतील पद काढून टाकण्यात आलं आहे. याबाबत विचार करताना मला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त कंपनीबाबत कृतज्ञतेची भावना वाटत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पहिल्यांदाच मायक्रोसॉफ्ट कंपनीत रुजू झालो होतो. परदेशात नोकरीनिमित्त गेल्यावर येथील अनुभव माझा कसा होता, तो आजही मला आठवतोय. २१ वर्षे मी या कंपनीत काम केलं. अनेक महत्त्वाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडल्या. कारण हे माझ्यासाठी खूप समाधानकारक आणि शिकवणारं होतं, असं या पत्रात म्हटलं आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने मला कौशल्यं शिकण्याच्या अनेक संधी दिल्या. याचा मी पुरेपूर फायदा घेऊ शकलो. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला मिळालेला अनुभव केवळ वर्षांमध्ये मोजता येणार नाही, अशा आशयाचं पत्र संबंधित व्यक्तीने लिहित कंपनीचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

नेमकं कारण काय?

मागील तीन महिन्यांपासून पर्सनल कॉम्प्युटर मार्केट घसरत आहे. त्यामुळे त्याचा फटका विंडोज आणि डिव्हाइसच्या विक्रीला बसला आहे. फटका बसल्यामुळे कंपनीवर आपल्या क्लाउड युनिट Azure मध्ये वाढीचा दर कायम ठेवण्याचा दबाव आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील अहवालानुसार, मायक्रोसॉफ्टने त्यांच्या अनेक विभागांमध्ये जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आव्हानात्मक अर्थव्यवस्थेचा सामना करणारी मायक्रोसॉफ्ट ही नवीनतम मोठी टेक कंपनी आहे.

जुलैमध्येही मायक्रोसॉफ्टने काही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. ३० जूनपर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये २,२१,००० पूर्णवेळ कर्मचारी होते, त्यापैकी १,२२,००० युनायटेड स्टेट्समध्ये कार्यरत होते. तर ९९,००० आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होते.


हेही वाचा : मायक्रोसॉफ्टमध्ये आजपासून नोकरकपात, नेमकं कारण काय?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -