Indian Railway: मोठा दिलासा ! १७०० रेल्वे गाड्यांचे तिकिट १५ टक्क्यांपर्यंत स्वस्त होण्याचे संकेत

Indian Railway good news for those traveling by train tickets can be cheaper bye upto 15 percent
Indian Railway: मोठा दिलासा ! १७०० रेल्वे गाड्यांचे तिकिट १५ टक्क्यांपर्यंत स्वस्त होण्याचे संकेत

Indian Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण रेल्वे तिकीट आता १५ टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकते. गेल्या आठवड्यात भारतीय रेल्वेने विशेष गाड्या नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, म्हणजेच सामान्य प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. देशात कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता सर्व गाड्या नियमित केल्यामुळे प्रवासी भाडे कमी होईल असे संकेत दिले जात आहे. त्यानुसार आता १७०० झोनल रेल्वेतील मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे विशेष टॅग काढून त्यांच्या तिकिटांच्या किंमती कमी करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे आता भारतीय रेल्वेकडून या गाड्यांचे प्रवासी भाडे १५ टक्क्यांनी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

एका अहवालानुसार, रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “कोरोना महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्यांची जागा सामान्य रेल्वे गाड्यांनी घेतली आहे. त्यामुळे प्रवासी भाड्यात सुमारे १५ टक्के कपात होणार आहे.

यामुळे ‘स्पेशल’ टॅग देण्यात आलेल्या सुमारे १७०० गाड्यांच्या प्रवासी भाड्यात येत्या काही दिवसांत कपात होणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ११८०.१९ दशलक्ष प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला होता, तर मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ६९.८० दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला होता. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत भारतीय रेल्वेने प्रवासी भाड्यातून १५,४३४.१८ कोटी रुपयांची कमाई केली. त्याच वेळी, गेल्या वर्षी सप्टेंबर २०२० पर्यंत, रेल्वेने प्रवासी भाड्यातून १,२५८.७४ कोटी रुपये कमावले होते. कोरोना महामारीच्या पूर्वीच्या तुलनेपेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे. रेल्वेने २०१९-२० मध्ये ४१७३.५२ दशलक्ष प्रवासी वाहतूक केली यातून सप्टेंबर २०१९ पर्यंत २६,७४२.७३ कोटी रुपये कमावले.

भारतीय रेल्वे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी इतर सर्व उपाययोजना राबवत आहे. यामध्ये ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न न देणे आणि प्लॅटफॉर्म तिकिटांचे उच्च दर यांचा समावेश आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांचे जास्त दर यासाठी करण्यात आले की, रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी रोखता यावी. एका अधिकाऱ्याने सांगितले, “कोरोना महामारी अजूनही कायम आहे, आम्ही तिकिटांच्या ओव्हर-द-काउंटर विक्रीला किंवा शिजवलेले अन्न सर्व्ह करण्यास परवानगी देणार नाही.”