Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत भारताचा डिजिटल रुपया आज येणार चलनात; RBIची योजना

भारताचा डिजिटल रुपया आज येणार चलनात; RBIची योजना

Subscribe

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन यांनी 2022-23 पासून ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून रिझर्व बँकेकडून डिजिटल रुपी जारी करण्याचा प्रस्ताव दिला होता.

देशाची डिजिटल करन्सी म्हणजेच ‘डिजिटल रुपया’ चा पहिला पहिला पायलट प्रोजेक्ट मंगळवार दिनांक १1नोव्हेंबर 2022 पासून सुरु करण्यात येईल. या डिजिटल करन्सीचा वापर 9 बँक सरकारी सिक्योरिटीजमध्ये आर्थिक व्यवहारासाठी करतील. याचा संदर्भांत भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी एक निवेदन जारी केले होते. त्या निवेदनात असे म्हटले होते की, डिजिटल रुपयाचा पहिला पायलट परीक्षण 1 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होईल. या टेस्टिंगअंतर्गत सरकारी सिक्योरिटीजमध्ये सेकेंडरी मार्केटव्यवहार केला जाईल. (India’s digital rupee to be launched today; Scheme of RBI)

दरम्यान आरबीआयने ‘केंद्रीय बँक डिजिटल मुद्रा’ (central bank digital currency OR CBDC) आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे आणि डिजिटल रुपयाची पायलट टेस्टिंग सुरू केली आहे. होलसेल व्हवहारासाठी (Wholesale Transactions) साठी होणाऱ्या या परीक्षणात 9 बँक समाविष्ट होतील. या बँकांमध्ये भारतीय स्टेटबँक (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, यूनियनबँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येसबँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी इत्यादी बँकांचा समावेश आहे.

- Advertisement -

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन यांनी 2022-23 पासून ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून रिझर्व बँकेकडून डिजिटल रुपी जारी करण्याचा प्रस्ताव दिला होता. वर्ष 2022-23 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, निर्मला सीतारामन त्यांनी स्पष्ट केले की सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) सुरू केल्याने डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. “डिजिटल चलनामुळे अधिक कार्यक्षम आणि स्वस्त चलन व्यवस्थापन प्रणाली देखील निर्माण होईल” असंही केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन म्हणाल्या.

दरम्यान अर्थसंकल्पानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले तेव्हा होते, की हे डिजिटल चलन सध्याच्या चलनामध्ये रुपांतरित करता येऊ शकते. या व्यवस्थेमुळे डिजिटल पेमेंट, ऑॅनलाईन पेमेन्ट अधिक सुरक्षित होईल. जागतिक पातळीवर डिजिटल पेमेंट व्यवस्था अधिक सुलभ करता येईल आणि कागदी नोटा छापण्याचा, हाताळण्याचा आणि वितरणाचा जो आर्थिक भार पडतो तो या डिजिटल चलनामुळे कमी होईल. असं पतंप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान रिझर्व्ह बँकनुसार भविष्यात पालयट परीक्षणामध्ये होलसेल स्तरावर होणाऱ्या अन्य व्यवहार व पेमेंटवरही लक्ष दिले जाईल.


- Advertisement -

हे ही वाचा – एलपीजी सिलिंडर ११५ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -