घरदेश-विदेशदेशातील पहिलं 'क्रिप्टोकरंसी' ATM, वैशिष्ट्यं काय

देशातील पहिलं ‘क्रिप्टोकरंसी’ ATM, वैशिष्ट्यं काय

Subscribe

'आम्ही रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं', हे मशीन बनवणाऱ्या कंपनीने स्पष्ट केलं आहे.

सध्या बंगळुरूच्या ‘कॅम्प मॉल’मधलं ATM मशीन देशभरात चर्चेचा विषय बनलं आहे. हे एटीएम साधसुधं नसून देशातील पहिलं क्रिप्टोकरंसी एटीएम मशीन आहे. भारतातील हे पहिलं क्रिप्टोकरंसी मशीन ‘व्हर्चुअल करंसी एक्सचेंज युनोकॉईन’ने १४ ऑक्टोबरला लाँच केलं. या एटीएमचा वापर पैसे भरण्यासाठी तसंच अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी होऊ शकतो. या पैशांचा वापर नंतर युनोकॉईनच्या वेबसाईवरुन तसंच अॅपवरुन क्रिप्टो करंसी विकत घेण्यासाठी केला जाऊ शकतो. उपलब्ध माहितीनुसार, संबंधित कंपनी पुढील आठवड्यात दिल्ली आणि मुंबईमध्येही अशाचप्रकारची ATM मशीन्स सुरू करण्यात येणार आहेत. क्रिप्टोकरंसीच्या व्यवहाराला भारतामध्ये अद्याप कायदेशीर परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे अशाप्रकारचं एटीएम मशीन कायद्याने अवैध ठरु शकतं. याआधीही हे मशीन बनवणाऱ्या कंपन्यांना अनेक कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. मात्र, यावेळी ‘आम्ही रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं’ मशीन बनवणाऱ्या कंपनीने स्पष्ट केलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या ATM चा भारतीय बॅंकिंग सिस्टीमशी काहीही संबंध नाही आणि म्हणूनच आम्ही आरबीआयच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही.

कसं काम करणार हे ATM मशीन?

मशीन बनवणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे ATM मशीन अन्य मशीन्सप्रमाणेच काम करतं. ग्राहकांना या क्रिप्टोकरंसी एटीएममध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आपला कस्टमर आयडी नंबर रजिस्टर करावा लागेल. या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. ओटीपी मिळाल्यानंतर ग्राहक पैसे जमा करु शकतात. पैसे जमा केल्यानंतर क्रिप्टोकरंसी खरेदी करण्यासाठी युनोकॉईनच्या वेबसाईटवरुन किंवा मोबाईल अॅपवर जावं लागेल. एकावेळी या एटीएममध्ये ग्राहक १००० पासून ते १० हजार रुपयांपर्यंत पैसे डिपॉझिट करु शकतात.


वाचा: मलाईकाच्या या ‘फिगर’ फोटोवर, चाहते फिदा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -