दिल्ली हिंसाचार: गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या; नाल्यात आढळला मृतदेह

दिल्लीतील गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली आहे.

दिल्लीत सीएएवरून सलग तिसर्‍या दिवशी हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. तर सुमारे २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, यामध्ये दिल्लीतील गुप्तचर अधिकाऱ्यांची देखील हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अंकित शर्मा (२५) असे या गुप्तचर अधिकाऱ्यांचे नाव असून या आयबी अधिकाऱ्यांचा मृतदेह नाल्यात सापडला असून ही हत्या करण्यात आली असल्याचा आरोप शर्मा यांच्या कुटुंबियांने केला आहे.

नेमके काय घडले?

गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कर्तव्य बजावून घरी परतत होते. त्यानंतर काही लोकांनी त्यांना चांद बाग पुलिया याठिकाणी घेरले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह नाल्यात टाकण्यात आला होता, अशी माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता, अंकित यांचा मृतदेह नाल्यात आढळून आला आहे.

दरम्यान, अंकितचे वडील रविंद्र शर्मा हेही आयबीमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. त्यांनी आपच्या समर्थकांवर खुनाचा आरोप केला आहे. त्याचे म्हणणे आहे की, ‘आपच्या समर्थकांनी अंकितला मारहाण करून गोळ्या घालण्यात आल्या आहेत’,असा आरोप त्यांनी केला आहे. तर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयात पाठविला आहे.

दिल्लीत सीएएवरून सलग तिसर्‍या दिवशी हिंसाचार सुरू असून आतापर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. तर सुमारे २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून हिंसाग्रस्त भागातील शाळा, कॉलेज बुधवारीही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आल्या आहेत. तसेच काल रात्री उशिरा अजित डोवालांनी पाहणी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी देखील बैठक घेऊन या हिंसाचार संदर्भात आढावा घेणार आहेत.

सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या तुकड्या तैनात

दिल्लीतील हिंसाचारात एका पोलीस कॉन्स्टेबलसह १३ जण ठार झालेत. हिंसाचारात ५६ पोलिस आणि १४० पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी सतत गस्त घालत आहेत.

दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

हिंसाचारग्रस्त भागात दिल्ली पोलिसांना दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हल्लेखोरांना रोखण्यासाठी पोलिसांना हे आदेश देण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच उत्तर दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना दिले नसल्याचे दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते एम. एस. रंधवा यांनी सांगितले. मात्र काही वृत्तवाहिन्यांनी तसे आदेश देण्याचे म्हटले आहे.


हेही वाचा – दिल्लीतील हिंसाचारातील मृतांचा आकडा पोहचला २० वर