घरताज्या घडामोडीInternational Flights : भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक कधीपर्यंत बंद राहणार? DGCA...

International Flights : भारतात आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक कधीपर्यंत बंद राहणार? DGCA चा नवा आदेश

Subscribe

देशातील कोरोना रूग्णांमध्ये दररोज पडणारी भर पाहता आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सवर येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा हवाई उड्डाण क्षेत्रातील नियामक असलेल्या डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशन (DGCA) ने केली आहे. शेड्युल़्ड इंटरनॅशनल फ्लाईट्सवर २३ मार्च २०२० पासून बंदी घालण्यात आली होती. पण विशेष प्रवासी वाहतुक करणाऱ्या विमानांना जवळपास ४० देशांमध्ये एअर बबल अंतर्गत प्रवासी वाहतूक करण्यासाठी मुभा देण्यात आली होती.

DGCA ने जारी केलेल्या सर्क्यूलरमध्ये म्हटले आहे की, शेड्यूल्ड इंटरनॅशनल कर्मशिअल प्रवासी वाहतूक सेवा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत २३.५९ वाजेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. त्यामध्ये कार्गो ऑपरेशन आणि डीजीसीएने मंजूर केलेल्या फ्लाईट्सवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच बबल यंत्रणेतील फ्लाईट्सवरही कोणताही परिणाम होणार नाही. या आदेशाची कडक अंमलबजावणी करावी, असेही डीजीसीएने स्पष्ट केले.

- Advertisement -

डीजीसीएने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी घोषणा करत शेड्यूल्ड आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक ही १५ डिसेंबरपासून सुरळीत करत असल्याचे जाहीर केले होते. पण जागतिक पातळीवर ओमिक्रॉनच्या संकटामुळेच DGCA ला पंतप्रधान कार्यालयाने सर्व कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले. त्यानंतर १ डिसेंबर २०२१ रोजी DGCA ने आपला २६ नोव्हेंबरचा आदेश अंमलात आणत आंतरराष्ट्रीय फ्लाईट्सवरील बंदी कायम राहील असे स्पष्ट केले.

- Advertisement -

देशांतर्गत प्रवासी वाहतूकीत वाढ

एकट्या डिसेंबर महिन्यात १.१२ कोटी देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा समोर आला आहे. हा आकडा नोव्हेंबरच्या तुलनेत ६.७ टक्के अधिक आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये १.०५ कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती डीजीसीएने दिली. २०२१ वर्षामध्ये ८.३८ कोटी प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला. ही वाढ ३३ टक्के असल्याचे डीजीसीएने स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -