घर देश-विदेश जपान खरंच गायब होणार?

जपान खरंच गायब होणार?

Subscribe

जपानमध्ये लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. जपानमधील लोकसंख्या हे आव्हान नाही, परंतु जपानच्या जन्मदरात झालेली ऐतिहासिक घसरण हे चिंतेचं कारण बनलयं. कारण, समोर आलेल्या माहितीनुसार, जपानमधील लोकांना मुलांना जन्माला घालायचंच नाहीये. जपानमध्ये ही एक गंभीर समस्या बनली आहे.

जपानचं नाव ऐकल्यावर आपल्या समोर येतं जपानची लोकं किती मेहनती असतात. तसंच जापान म्हणजे मागच्या अनेक दशकांपासून तंत्रज्ञानाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असणारा देश. आता पुन्हा एकदा जपान चर्चेत आलाय तो तिथल्या पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे. जपानच्या पंतप्रधान म्हणाल्या की, हे असंच सुरु राहिलं तर जपान एक दिवस गायब होईल. जपानच्या पंतप्रधान असं का म्हणाल्या आणि जपानमध्ये नेमकं घडतंय तरी काय, ते जाणून घेऊया. (International news Japan will Disapper one day what is happening in Japan know in detail )

जपानमध्ये लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. जपानमधील लोकसंख्या हे आव्हान नाही, परंतु जपानच्या जन्मदरात झालेली ऐतिहासिक घसरण हे चिंतेचं कारण बनलयं. कारण, समोर आलेल्या माहितीनुसार, जपानमधील लोकांना मुलांना जन्माला घालायचंच नाहीये. जपानमध्ये ही एक गंभीर समस्या बनली आहे.

- Advertisement -

2022 मध्ये जपानमध्ये 7 करोड 99 लाख 728 लाख मुलांचा जन्म झाला. मागच्या 125 वर्षांत पहिल्यांदाच एका वर्षात इतक्या कमी मुलांचा जन्म झालाय. तर 2022 मध्ये 15 लाख 80 हजार लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच, जपानमधील जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा खूप कमी आहे.

  • 1 जानेवारी 2023 ला जपानची लोकसंख्या 12 करोड 47 लाख होती, जी 1 जानेवारी 2022 च्या लोकसंख्येपेक्षा 0.43% कमीय  तसंच,
  •  2065 पर्यंत, जपानची लोकसंख्या कमी होऊन 8 करोड 80 लाख होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. म्हणजे सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत 30% कमी असणारे.

जपानमध्ये भांडवलशाहीला प्रोत्साहन मिळालं आणि देशाचा विकास झाला. शहरीकरण झालं. लोकांचं राहणीमान उंचावलं, जपानमध्ये आरोग्य विषयक सुविधा वाढल्या आणि जपानचा जन्मदर घसरला. हे ऐकायला थोडं वेगळं वाटतंय पण जपानच्या बाबतीत हेच सत्य आहे.

- Advertisement -

प्रत्येकाला असं वाटतं की खूप जगावं, आपलं आयुष्य वाढावं, जपानमध्ये तेच होतंय. जपानमध्ये सरासरी वय 84 वर्ष आहे. त्यामुळे इथे लोकांचं जास्त जगणंच या सुंदर देशासाठी मोठं संकट बनलयं. थोडक्यात असं की, लोकांचं वय वाढतंय लोकं रिटायर्ड होतायत, परंतु त्यांच्याजागी काम करणाऱ्यांची संख्या कमी होतेय.

( हेही वाचा: राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह आता बॅकफूटवर! म्हणाले, “अयोध्येत आले तर…” )

जपानच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकसंख्या 62 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे, जी 2050 पर्यंत एक तृतीयांश वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात जपानसाठी लोकसंख्येचे संकट किती मोठी समस्या असेल, हे यावरून समजू शकते की जपानमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची संख्या 29% आहे. तर शून्य ते 14 वर्षे वयोगटातील मुलांची लोकसंख्या केवळ 11.6% आहे.

गेल्या अनेक वर्षांत इथे लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेंड खूप वेगाने वाढला आहे. लिव्ह-इनमध्ये राहणारे तरुण आपलं जीवन आनंदाने जगत आहेत.  परंतु त्यांना पालक होण्याची इच्छा नाही. इथले लोक मुलांना ‘अडचण’ समजू लागले आहेत. जपानमधील तरुण मुली लग्न करून मुलं जन्माला घालण्यास टाळाटाळ करत आहेत. जपानमध्ये, 2020 मध्ये, 25 ते 29 वयोगटातील 66% मुलींनी लग्न केलं नाही तर 30 ते 34 वयोगटातील 39% मुलींनी लग्न करण्याचे टाळले. हा आकडा जपानसाठी भयावह आहे.

जपानचं सरकार जन्मदर वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवत आहे. विवाहित जोडप्यांना मुले होण्यासाठी प्रोत्साहन देणे. तसेच, सरकारने बाल संगोपन संस्थांच्या सेवांचा विस्तार केला आहे. काम आणि खासगी आयुष्याचा समतोल निर्माण करण्यासाठी योजना तयार केल्या आहेत. पण, त्याचा काही विशेष परिणाम झालेला दिसत नाही.

- Advertisment -