‘हा कदाचित माझा शेवटचा व्हिडीओ…’, हिजाबशिवाय व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी प्रसिद्ध इराणी अभिनेत्रींना अटक

हिजाबविरोधात देशभरात मागील काही काळापासून आंदोलने केली जात असून, याच हिजाब प्रकरणी इराणमध्ये दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. हेंगमेह गजियानी आणि कातायुन रियाही अशी या अभिनेत्रींची नावे आहेत.

हिजाबविरोधात देशभरात मागील काही काळापासून आंदोलने केली जात असून, याच हिजाब प्रकरणी इराणमध्ये दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. हेंगमेह गजियानी आणि कातायुन रियाही अशी या अभिनेत्रींची नावे आहेत. इराण सरकारच्या विरोधात जाण्याच्या आरोपाखाली या दोघींना अटक करण्यात आली आहे. (Iran Hijab Protest Updates Actress Hengameh Ghaziani Katayun Riyahi Arrested)

इराणमध्ये दोन महिन्यांपासून हिजाबविरोधी निदर्शने सुरू आहेत. अशातच या दोन्ही अभिनेत्रींनी हिजाबच्या निषेधाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या दोघींना अटक करण्यात आली. त्यानुसार, 52 वर्षीय हेंगामेह गजियानीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने हिजाब घातला नव्हता. हा व्हिडिओ गजबजलेल्या भागात शूट करण्यात आला आहे. यामध्ये हेंगामेह गजियानी त्यांचा हिजाब काढून केस बांधताना दिसल्या होत्या.

या व्हिडीओसोबत तिने लिहिले होते की, “हा कदाचित माझा शेवटचा व्हिडिओ आहे. मला एवढेच सांगायचे आहे की, या क्षणानंतर माझ्यासोबत काहीही झाले तरी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इराणच्या लोकांच्या पाठीशी आहे”.

मागील आठवड्यात हेंगमेह गजियानी यांनी दुसर्‍या पोस्टमध्ये सरकारवर 50 तरुणांची हत्या केल्याचा आरोप केला आणि त्यांना चाइल्ड किलर म्हटले. काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, या आंदोलनात आतापर्यंत 400 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक तरुणांचाही समावेश आहे. याप्रकरणी सुमारे 16,800 लोकांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, दरम्यान, 16 सप्टेंबर रोजी 22 वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूनंतर निदर्शने सुरू झाली. हिजाब न घातल्याने पोलिसांनी महसाला अटक केली होती. तिला कोठडीत आपला जीव गमवावा लागला होता. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर 60 वर्षीय कातायुन रियाही हिजाबशिवाय सार्वजनिकपणे दिसणारी पहिली अभिनेत्री आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सक्तीच्या हिजाबच्या विरोधात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सप्टेंबरमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून अनेक अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मित्रा हज्जर, बरन कोसरी आणि तराणेह अलीदोस्ती यांच्या अटकेचा समावेश आहे.


हेही वाचा – ‘समान नागरी कायदा’ 2024 पर्यंत राज्यांनी लागू करावा अन्यथा…; अमित शहांचा अल्टिमेटम