घरदेश-विदेशआयएसआय एजंटची नेपाळमध्ये हत्या, डी-गँगशी होते संबंध

आयएसआय एजंटची नेपाळमध्ये हत्या, डी-गँगशी होते संबंध

Subscribe

नेपाळमध्ये आयएसायच्या गुप्तहेराला आज दोन हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार मारले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. कारमधून उतरत असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्या घराबाहेर ही घटना घडली.

पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंससाठी काम करणाऱ्या एजंटची ओळख लाल मोहम्मद उर्फ ​​मोहम्मद दर्जी अशी आहे. हा एजंट नेपाळमधून बनावट नोटा भारतात पाठवत होता. या एजंटची हत्या कोणी केली याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता, गोळी झाडतानाचे दृष्य कैद झाले आहे. कारमधून उतरत असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

- Advertisement -

डी-गँगशी होते संबंध –

आयएसआयच्या सांगण्यावरून लाल मोहम्मद पाकिस्तान आणि बांग्लादेशातून बनावट भारतीय चलन नेपाळमध्ये आणायचा आणि तेथून भारतात पुरवायचा. लाल मोहम्मदने आयएसआयला लॉजिस्टिक सपोर्टमध्ये मदत केली होती आणि अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमचे डी-गँगशी संबंध होते. त्याने इतर आयएसआय एजंटनाही आश्रय दिला होता, असे इंडिया टुडेने भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले – 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये लाल मोहम्मद काठमांडूच्या गोथर भागात त्याच्या घराबाहेर आलिशान कारमधून खाली उतरताना दिसत आहे. त्याच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच लाल मोहम्मदने त्याच्या कारच्या मागे लपण्याचा प्रयत्न केला. लालला वाचविण्यासाठी त्याच्या मुलीने घराच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. मात्र, ती पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -