अरुण गोविल आणि दीपिका पुन्हा एकदा राम-सीतेच्या भूमिकेत

'रामायण' या प्रसिद्ध मालिकाचे दोन्ही कलाकार दिल्लीतील रामलीला मंचावर पुन्हा एकदा भगवान राम आणि सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दूरदर्शनवर 1987 मध्ये आलेल्या ‘रामायण’ या मालिकेने प्रत्येक चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. आजही या मालिकेचे अनेक चाहते आहते. ‘रामायण’ (ramayan)मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल 34 वर्षांनंतर अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया ही जोडी पुन्हा एकदा श्री राम आणि माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘रामायण’ या प्रसिद्ध मालिकाचे दोन्ही कलाकार दिल्लीतील रामलीला मंचावर पुन्हा एकदा भगवान राम आणि सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हे ही वाचा – ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेत दोन मैत्रिणी दिसणार पुन्हा एकत्र; होणार ‘या’ अभिनेत्रीची एंट्री

दिल्लीतील मैदानावर रामलीलाचे आयोजन करणाऱ्या श्री हनुमंत धार्मिक रामलीला समितीचे सरचिटणीस ललित गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली की, 1 ऑक्टोबर 2022 रोजी धनुष्यबाणापासून ते सीता स्वयंवर पर्यंत सर्व घटना या कार्यक्रमात दाखविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया अभिनय करताना दिसणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे.

हे ही वाचा – सोनम कपूरच्या मुलाचं पार पडलं बारसं; फोटो शेअर करत ठेवलं ‘हे’ अनोखं नाव

लाल किल्ल्यातील माधवदास पार्कमध्ये श्री धार्मिक लीला समितीतर्फे रामलीलाच्या स्टेजसाठी तीन मजली स्टेज तयार करण्यात येत आहे. समितीचे सरचिटणीस धीरजधर गुप्ता आणि मंत्री प्रदीप शरण यांनी सांगितले की, रामलीला समिती यंदा शताब्दी वर्ष साजरे करत आहे. लोकसंख्या लक्षात घेता प्रवेश करण्यासाठी शताब्दी द्वार, वाल्मिकी द्वार, तुलसी द्वार आणि राम द्वार असे चार दरवाजे बांधण्यात आले आहेत.

रामायण या मालिकेची झलक सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यात रावण जेव्हा लक्ष्मणरेखा ओलांडतो तेव्हा अग्नी प्रज्वलित करण्यात येईल. रावण-जटायू, राम-रावण, लक्ष्मण-मेघनाथ यांच्यात हवाई युद्ध होईल. हनुमानाने लंका जाळण्याबरोबरच लक्ष्मण जखमी झाल्यास संजीवनी बुटीही विमानाने आणली जाईल.

हे ही वाचा – कृती सेननला आवडतो प्रभास? सोशल मीडियावर चर्चांना उधाण