घरताज्या घडामोडीइस्त्रायल झाला मास्क मुक्त, शाळांनाही झाली सुरूवात

इस्त्रायल झाला मास्क मुक्त, शाळांनाही झाली सुरूवात

Subscribe

मे महिन्यापासून पर्यटकांना फिरण्याची परवानगी देण्यात येणार असून त्यांना कोरोना लसीकरण करण्यात येणार

जगातील सर्वात देशात कोरोनाने हाहाकार घातला आहे. सध्या सर्वच देशात दिवसाला एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. जगात कोरोनाची दुसरी लाट भेडसावत असताना जगातील इस्रायल हा कोरोनामुक्त झाला असल्याचा एकमेव देश ठरला आहे. नुकतीच इस्रायलने कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली आहे. इस्रायलला हे जे यश प्राप्त झाले आहे. त्यामागे मोठे कारण हे कोरोना लसीकरणाचे आहे. या देशात कोरोना लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात करुन ९० टक्के लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे इस्रायलला कोरोनामुक्तीकडे वाटचाल करता आली आहे. या देशात आता लोकांना सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याचे बंधन घातले जात नाही आहे. तसेच थोड्या दिवसांत शाळा आणि सगळे व्यवसायही उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

इस्रायमध्ये आतापर्यंत ८ लाख ३७ हजार १६० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत ६ हजार ३३८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जानेवारीच्या सुरुवातील एका दिवसात या देशात १० हजार रुग्णांची नोंद होत होती परंतु आता इस्रायलमध्ये दिवसाला १०० ते १५० कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यामागचे कारण म्हणजे इस्रायलमध्ये डिसेंबरला सुरु केलेले लसीकरण, अवघ्या पाच महिन्यांत ८१ टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आल्यामुळे इस्रायलमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची गरज नाही असे इस्रायलने घोषित केले आहे.

- Advertisement -

इस्रायलमध्ये रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये फायझर आणि बायोटेकची कोरोना लस देण्यात आली. देशातील १६ वर्षांवरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे रोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांचे प्रमाण आता कमी झाले आहे. तसेच इस्रायलमध्ये दाखल होणाऱ्या प्रवाशांचे आणि नागरिकांचे कोरोना चाचणी करुन त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांच्यावर काही निर्बंध घालण्यात येत आहे.

इस्रायलयच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, आतापर्यंत ७ भारतीय व्हेरियएंटस ७ प्रवाशांमध्ये सापडले आहेत. जगात कोरोना हाहाकार घालत असताना आपण कोरोनाला हद्दपार करण्यात आघाडीवर असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पत्रकारांना सांगितले आहे. आपण अजूनही कोरोनाला हरवू शकलो नाही. कोरोना परत येऊ शकतो त्यामुळे काही निर्बंध हे पाळावेच लागतील असेही पंतप्रधान नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

परंतु कोरोना नियंत्रणात आल्यामुळे अनेक निर्बंध कमी करण्यात आले आहेत. तसेच शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मे महिन्यापासून पर्यटकांना फिरण्याची परवानगी देण्यात येणार असून त्यांना कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊन आणि निर्बंध जरी उपयुक्त असले तरी लसीकरण हेच नामी हत्यार आहे. हे इस्रायलने साऱ्या जगाला पटवून दिले असल्याचे सिद्ध झाले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -