घरताज्या घडामोडीइस्रोने 'गगनयान' मोहिमेसाठी मागितले स्वदेशी तंत्रज्ञानाचे प्रस्ताव

इस्रोने ‘गगनयान’ मोहिमेसाठी मागितले स्वदेशी तंत्रज्ञानाचे प्रस्ताव

Subscribe

भारत पहिल्यांदा 'गगनयान' मोहिमेद्वारे मानव अंतराळात पाठवणार आहे. त्यासाठी मॉस्को येथे हवाई दलाचे चार लढाऊ पायलट प्रशिक्षण घेत आहेत.

भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) मानवी अंतराळ अवकाशात पाठवणार आहेत. यासाठी
इस्रोने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या विकासाचे प्रस्ताव मागितले आहेत. इस्रोच्या मानव अंतराळ कार्यक्रम संचालनालयाने १८ संभाव्य तंत्रज्ञान विकास क्षेत्रांसाठी प्रस्ताव आमंत्रित केले आहेत. २०२२ मध्ये भारताची पहिली मानवनिर्मित अंतराळ मोहीम ‘गगनयान’ सुरू होणार आहे. त्यासाठी मॉस्को येथे हवाई दलाचे चार लढाऊ पायलट प्रशिक्षण घेत आहेत.

१८ तंत्रज्ञान विकास क्षेत्रांसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी १५ जुलै अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या क्षेत्रांमध्ये रेडिएशनच्या धोका आणि तो कमा करणे, अंतराळ आहार आणि संबंधित तंत्रज्ञान, मानवी रोबोटिक इंटरफेस, पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणाली, दीर्घकालीन मोहिमांसाठी मानवी मानवी मनोविज्ञान आणि कृत्रिम गुरुत्व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊनच्या काळात व्हिटॅमिन डी घ्या; ब्रीटनच्या नागरिकांना सूचना


संचालनालयाने आपल्या जाहीरनाम्यात असं म्हटलं आहे की, पृथ्वीच्या खालच्या कक्षेत आणि त्यापलीकडे माणसांना जगण्यासाठी मदत करण्यासाठी परवडणारी आणि स्वदेशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी राष्ट्रीय संशोधन / शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्तावाच्या मुख्य अन्वेषकाने आवश्यक माहिती पुरवली पाहिजे आणि तंत्रज्ञानाच्या वापराविषयी माहिती पुरविली पाहिजे. या प्रस्तावांची निवड करण्यासाठी इस्रो निवड समिती स्थापन करेल, असं त्यात म्हटलं आहे. वैज्ञानिक लाभ, प्रासंगिकता, तांत्रिक सामग्री आणि व्यवहार्यता या पैलू लक्षात घेऊन निवड केली जाईल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -