घरदेश-विदेशऐतिहासिक क्षण! इस्रोचं 'बाहुबली' रॉकेट लाँचिंगसाठी सज्ज, 36 सॅटलाइट होणार प्रक्षेपित

ऐतिहासिक क्षण! इस्रोचं ‘बाहुबली’ रॉकेट लाँचिंगसाठी सज्ज, 36 सॅटलाइट होणार प्रक्षेपित

Subscribe

इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणखी एक इतिहास रचण्यास सज्ज झाली आहे. इस्रोने एक नव मिशन हाती घेतल असून या मिशनला LVM3 M2/OneWeb India1 असं नाव देण्यात आलं आहे,. इस्रोचे LVM-3 M2 रॉकेट लाँचसाठी तयार आहे. याद्वारे 36 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात येणार आहेत. ISRO हे मिशन सर्वात वजनदार रॉकेट LVM 3 वरून म्हणजेच व्हेईकल मार्क 3 मधून लाँच करणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून हे बाहुबली रॉकेट LVM 3 लाँच करण्यात येणार आहे. मध्यरात्री 12 वाजून 07 मिनिटांनी हे रॉकेट हवेत झेपावणार आहे. रॉकेट LVM 3 याआधी GSLV मार्क रॉकेट म्हणून ओळखले जात होते.

बाहुबली रॉकेट LVM 3 यााधी GSLV मार्क रॉकेट म्हणून ओळखले जाते. न्यूस्पेस इंडिया लिमिडेट आणि वनवब यांच्याद्वारे LVM 3 रॉकेटमधून 36 सॅलेलाईट लाँच करण्यात येतील, या मिशनद्वारे ब्रिटीश स्टार्टअप कंपनी वनवेबचे 36 सॅटेलाईट लाँच होतील. या उपग्रहांना कॅप्स्युमध्ये बसवले गेले आहे. या रॉकेट लाँचिंगची अंतिम तपासणी सुरु आहे. ‘LVM-3’ हे इस्रोचे सर्वात वजनदार रॉकेट असल्याने त्याला बाहुबली रॉकेट हे नाव देण्यात आले आहे. या रॉकेटचे पहिल्यांदाच व्यावसायिक प्रक्षेपण होणार आहे.

- Advertisement -

वनवेब ही प्रायव्हेट ब्रिटीश सॅटेलाईट कंपनी आहे. वनवेब कंपनीमध्ये भारतीय कंपनी इंटरप्रायजेज एक प्रमुख होल्डर आहे. वनवेब सॅटेलाईट लाँचसह इस्रो ग्लोबल कमर्शिअल लाँच मार्केटमध्ये प्रवेश करेल.


मुंबई पोलिसांची दिवाळी गोड; राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -