Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश जय शिवाजी, जय महाराष्ट्र! राहुल गांधींनी महाराष्ट्रातून घेतला निरोप, भारत जोडो यात्रा...

जय शिवाजी, जय महाराष्ट्र! राहुल गांधींनी महाराष्ट्रातून घेतला निरोप, भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेशात

Subscribe

या अंधुक प्रकाशात राहुल गांधी कळ दाबताच सत्यमेव जयते स्तंभावर तिरंगी प्रकाश पडला. तर, तिरंगी फुगे आकाशात झेपावली. तिरंगी प्रकाशात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन धर्माची प्रतिके प्रकाशाने उजळली.

बुलढाणा – जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणत राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी अखेर महाराष्ट्रातून निरोप घेतला. भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात (Bharat Jodo Yatra In Maharashtra) होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी अनेकांशी गाठीभेटी घेतल्या. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी या भारत जोडो यात्रेला सहभाग नोंदवला. मात्र, आता भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात जाणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा कालचा शेवटचा दिवस होता. परंतु, राहुल गांधी आजपासून निवडणूक प्रचारासाठी गुजरात दौऱ्यावर जाणार असल्याने ही यात्रा पुढील दोन दिवस महाराष्ट्रातच राहिल. राहुल गांधी गुजरातहून परतल्यानंतर ते मध्य प्रदेशच्या दिशेने मार्गस्थ होतील.

हेही वाचा -महापुरुषांना मोजण्याचा वेडेपणा!

- Advertisement -

राहुल गांधी यांनी निमखेडी येथील शेवटच्या कॉर्नर सभेत महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. शिवाजी महाराजांचं शौर्य, बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान, महात्मा फुले यांची शिकवण, आणि सर्व महाराष्ट्रवासियांचं प्रेम प्रेरणा समजून पुढे जात आहे. या सत्कार आणि अभूतपूर्व अनुभवासाठी मी प्रदेशातील लोकांचे मनापासून आभार मानतो. जय शिवाजी, जय महाराष्ट्र! असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.


महाराष्ट्रात मध्य प्रदेशाच्या सीमेवर एकात्मतेचा प्रकाश उजळवत राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातून निरोप घेतला. राहुल गांधी यांच्यासाठी मेणबत्या प्रज्वलित करताच अंधुक प्रकाश झाला. या अंधुक प्रकाशात राहुल गांधी कळ दाबताच सत्यमेव जयते स्तंभावर तिरंगी प्रकाश पडला. तर, तिरंगी फुगे आकाशात झेपावली. तिरंगी प्रकाशात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन धर्माची प्रतिके प्रकाशाने उजळली.

- Advertisement -

हेही वाचा – न्याययंत्रणा तुम्ही बुडाखाली घेणार असाल तर… उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे

भारत जोडो यात्रा यशस्वी, पण…

राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील दौरा यशस्वी झाला असं काही राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. कन्याकुमारीपासून त्यांनी आपल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. १४ दिवस महाराष्ट्रात राहिल्यानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आता मध्य प्रदेशात जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राकडून त्यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. ही भारत जोडो यात्रा बंद करण्याचे आवाहन करण्यात राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपाने राहुल गांधी यांच्या सावरकरविरोधी वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. त्यामुळे येत्या काळात राहुल गांधी काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा – राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा मुक्काम महाराष्ट्रात वाढला, नेमकं काय आहे कारण?

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -