घरताज्या घडामोडीJallianwala Bagh massacre : जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भारतात कोणते बदल झाले? भारतीय...

Jallianwala Bagh massacre : जालियनवाला बाग हत्याकांडानंतर भारतात कोणते बदल झाले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मिळाली नवी दिशा

Subscribe

१०३ वर्षांपूर्वी एक धक्कादायक हत्याकांड घडले. ज्याचे पडसाद संपूर्ण पंजाबसह देशभरात उमटले. या हत्याकांडाला भारत आजही विसरलेला नाहीये. या घटनेत शांततापूर्ण विरोध करणाऱ्या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये महिला आणि लहान मुलांसह हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या या एका घटनेने देशाच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली आणि या घटनेने भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रचला गेला, असे इतिहासकार सांगतात.

त्या दिवशी नक्की काय घडले?

अमृतसरमध्ये जमावबंदी असूनही जालियनवाला बागेत १३ एप्रिल १९१९ रोजी बैसाखी सणाच्या मुहुर्तावर अनेक लोक शांततेने जमले होते आणि ब्रिटीशांच्या जुलमी कायद्याच्या रोलेट कायद्याच्या निषेधार्थ दोन नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ निषेध व्यक्त केला होता. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता. परंतु ब्रिटीश आर्मीची जनरल डायरची तुकडी या बागेत आली आणि त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता लोकांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. तसेच गोळ्या संपेपर्यंत त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला.

- Advertisement -

जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निःशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. नि:शस्त्र नागरिकांना कोंडीत गाठून असहाय्य अवस्थेत टिपून मारण्यात आले.

या घटनेचा परिणाम काय?

या घटनेमुळे संपूर्ण देशात इंग्रजांविरुद्ध रोष निर्माण झाला. बर्‍याच मध्यमवर्गाचा इंग्रजांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता. रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारकडून नाइटहूडचा मिळालेला सन्मान परत केला. या घटनेचा तरुणांमध्ये एवढा रोष होता की, देशसेवेची बीजे भगतसिंगांसारख्या मोठ्या क्रांतिकारकांमध्ये रोवली गेली. गांधींच्या असहकार चळवळीला मोठ्या प्रमाणावर यश मिळू लागले.

- Advertisement -

गांधीजींच्या असहकार आंदोलनाला भारतीय जनतेच्या प्रत्येक वर्गाचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाल्याने स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. जिथे नवीन लोक या चळवळीत सामील झाले. नेत्यांचा आत्मविश्वास खूप वाढला आणि चौरी चौराच्या घटनेनंतर आंदोलन थांबले.

उत्तर भारतात १९२० च्या दशकात जितकी क्रांतिकारी आंदोलनं आणि घटना घडल्या त्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाचा रोष अद्यापही तरूणांमध्ये आहे. त्यावेळी रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांनी आपल्या क्रांतिकारी पक्षात अनेक लोकांना भरती केले. त्याच वेळी काँग्रेसमधील जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या नेत्यांनी स्वराज्याच्या मागणीवर भर दिला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ मध्ये, जालियनवाला बागेत शहीदांच्या स्मरणार्थ एक स्मारक बनवण्यात आले, ज्याची तयारी स्वातंत्र्याच्या खूप आधीपासून सुरू होती. आज जालियनवाला बाग हे एक पर्यटन स्थळ बनले आहे. जिथे देशभरातील लोक शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धेने जातात.


हेही वाचा : CNG Rates Hike : महाराष्ट्रात महागाईचा भडका, मुंबई-पुण्यात सीएनजीच्या दरात पाच रुपयांनी वाढ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -