घरदेश-विदेशपुलवामा: सुरक्षा दल-अतिरेक्यांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार, दोन जवान जखमी

पुलवामा: सुरक्षा दल-अतिरेक्यांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार, दोन जवान जखमी

Subscribe

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील गुसू भागात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील गुसू भागात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू आहेत. या चकमकीत एक पोलिस कर्मचारी आणि सुरक्षा दलात एक जवान जखमी झाला आहे. इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आणि लष्कराची ५३ राष्ट्रीय रायफल्सची टीम गुसूमध्ये शोधमोहीम राबवित आहे. यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. या सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांने एका अतिरेक्याला ठार केले आहे.

पोलिस व लष्कराच्या जवानांनी सर्व परिसर घेरताच अतिरेक्यांनी संतप्त होऊन गोळीबार सुरू केला. अतिरेक्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. वरिष्ठ पोलिस अधिका्यांनी संयुक्त संघ आणि अतिरेक्यांमधील गोळीबाराची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे दोन ते तीन अतिरेकी लपले असून अजूनही अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू आहे.

- Advertisement -

CRPF जवानांवर केला होता दहशतवाद्यांवर हल्ला

यापूर्वी ५ जुलै रोजी पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलावर (सीआरपीएफ) दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. आयईडी स्फोटातून सीआरपीएफच्या समुहाला IED ब्लास्टच्या माध्यमातून लक्ष्य केले आहे. स्फोटानंतर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या समुहावर गोळीबार केला. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर घेरला गेला आहे.


दहशतवादी हल्ला: मृत आजोबा उठतील, याची चिमुरडा बघतोय वाट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -