घरदेश-विदेशजम्मू-कश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त मुलींना अनोखी भेट

जम्मू-कश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त मुलींना अनोखी भेट

Subscribe

जिल्हा प्रशासनाने परिवहन विभागाच्या सहकार्याने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गत सहा गुलाबी वाहने सुरू

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्ताने जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्हा प्रशासनाने एक अनोखा पुढाकार घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने परिवहन विभागाच्या सहकार्याने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गत सहा गुलाबी वाहने सुरू केली आहेत. ही वाहनं सुरू करण्यापुर्वी तेथे सर्वेक्षण देखील करण्यात आले.

- Advertisement -

जिल्हा विकास आयुक्त, राजौरी, मोहम्मद एजाज शेख म्हणाले की, परिवहन विभागाने एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणानुसार असे लक्षात आले की, गर्दीमुळे मुलीसह महिलांनादेखील सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना त्रासाला सामोरं जावे लागत होते, ही समस्या विचारात घेता जिल्हा प्रशासनाने काही गुलाबी गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – प्रचाराचा शेवटचा रविवार; महाराष्ट्रात दिग्गजांच्या सभांचा धडाका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -