घरदेश-विदेशपुलवामाच्या काकापोरा रेल्वे स्टेशनजवळ दहशतवादी हल्ला; 2 आरपीएफ जवान शहीद, 1 जखमी

पुलवामाच्या काकापोरा रेल्वे स्टेशनजवळ दहशतवादी हल्ला; 2 आरपीएफ जवान शहीद, 1 जखमी

Subscribe

पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा रेल्वे स्थानकाजवळील एका चहाच्या स्टॉलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. स्टॉलवर चहा पित असलेल्या रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात रेल्वे सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत. हल्ला केल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या काकापोरा रेल्वे स्थानकाजवळील एका चहाच्या स्टॉलवर चहा पीत असलेल्या रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात रेल्वे सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत, तर एक जवान जखमी झाला आहे. तीन जखमी जवांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापैकी दोन जखमींना डॉक्टरांनी शहीद घोषित केले.

- Advertisement -

हल्ल्यातील आणखी एका जखमी जवानावर उपचार सुरू आहेत. शहीद झालेल्या जवानांची नावे एसआय देवराज आणि हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र सिंग अशी आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात नाकेबंदी करून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक नाक्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची झडती घेतली जात आहे.


लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारताच्या नव्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -