घरCORONA UPDATEJEE आणि NEET (UG) Exam : पुढील महिन्यात या तारखांना होणार परीक्षा

JEE आणि NEET (UG) Exam : पुढील महिन्यात या तारखांना होणार परीक्षा

Subscribe

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जेईई JEE २०२० आणि नीट NEET (UG) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच आता या परिक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या दोन्हीच्या परीक्षा पुढील महिन्यात होणार असून जेईईच्या या १ ते ६ सप्टेंबर तर नीट (युजी) ची १३ सप्टेंबरला परीक्षा होणार आहे. ही माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून दिली असल्याचे ट्विट एएनआयने केले आहे. दरम्यान, आजच भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्याकडे नीट तसेच जेईई सारख्या परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. यासंबंधीचे पत्र त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी पाठवणार असल्याचेही ट्विटमध्ये नमूद केले होते.

- Advertisement -

काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी

मी नुकतीच शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून त्यांना सुचवले आहे की, नीट आणि अन्य परीक्षा दिवाळी नंतर घेतल्या जाव्यात. परीक्षांची तारीख निश्चित करण्याचे काम सुप्रीम कोर्टाने सरकारवर सोपवलेल असल्याने, यामध्ये काही अडचण यायला नको. मी तातडीने पंतप्रधानांना या संदर्भात पत्र पाठवणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

वय वर्षे ६५ आणि १८ महिन्यांत तिला झाली ८ मुलं! भ्रष्टाचाराचा अव्वल नमुना!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -