घरदेश-विदेशमहात्मा गांधींना शिवीगाळ केल्याचा पश्चाताप नाही, कालीचरण महाराजांनी केला नवा वादग्रस्त व्हिडीओ...

महात्मा गांधींना शिवीगाळ केल्याचा पश्चाताप नाही, कालीचरण महाराजांनी केला नवा वादग्रस्त व्हिडीओ शेअर

Subscribe

महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने कालीचरण महाराज यांच्यावर जोरदार टीका होतोय. छत्तीसगडच्या धर्मसंसदेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. कालीचरण महाराजांच्या या वादग्रस्त विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेतही पाहायला मिळाले. यावेळी कालीचरण महाराजांच्या अटकेची मागणी सभागृहात करण्यात आली. अशात रायपूरमध्ये कालीचरण महाराजांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. असे असतानाही कालीचरण महाराजांनी आज एक नवा व्हिडीओ शेअर करत महात्मा गांधींना शिवीगाळ केल्याचा मला कोणताही पश्चाताप झाला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कालीचरण महाराजांनी शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटले की, मला फाशीवर चढवा तरी मला काही फरक पडत नाही. मी गांधीजींचा विरोधी आहे. त्यामुळे अशा एफआयआरमुळे मला कोणताही पश्चाताप होणार नाही. मी गांधीजींचा तिरस्कार करतो. यासाठी मला फाशीची शिक्षा सुनावली तरी मी स्वीकारेन.

- Advertisement -

छत्तीसगडच्या रायपुर येथील धर्मसंसदेच्या जाहीर कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींना शिवीगाळ करत गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचे कौतुक केले. या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना कालीचरण महाराजांनी नवा व्हिडीओ शेअर करत आता आगीत तेल टाकण्याचे काम केलेय.

या व्हिडीओ कालीचरण महाराजांनी FIR बद्दल सांगितले की, महात्मा गांधींविरोधात अपशब्द वापरल्याचा मला कोणताही पश्चाताप होत नाही. मी गांधीजींचा तिरस्कार करतो. त्यांनी हिंदूंसाठी काय काम केले? असा सवाल उपस्थित केला.

- Advertisement -

वंशवाद पसरवल्याचे लावले आरोप

कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींवर वंशवाद पसरवल्याचे आरोप करत काँग्रेसने त्याला अधिक खतपाणी घातल्याचे म्हटले आहे. यावेळी कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींप्रति द्वेषपूर्ण शब्दांचा वापर करत पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जागी जर सरदार वल्लभभाई पटेल सत्तेवर तर भारत अमेरिकेच्याही पुढे असता असे म्हटले आहे. तर देश आर्थिक दृष्ट्या आघाडीवर असता. असे म्हटले.

कालीचरण यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये काँग्रेसवरही आरोप केले आहे. काँग्रेसने पक्षाअंतर्गत अनेक प्रतिभावान लोकांना पुढे येऊ दिले नाही. ज्योतिरादित्य सिंधियासारख्या प्रतिभावान नेत्याला दाबण्याचा प्रयत्न केला. अशी टीका कालीचरण महाराजांनी केली आहे. तसेच महात्मा गांधी काँग्रसेच्या वंशवादाचे जनक म्हणत ते राष्ट्रवादाचे जनक नाहीत असा आरोप केला. यामुळेचे गांधींनी राष्ट्रपिता म्हणत नाही असे कालीचरण यांनी म्हटले आहे.

कालीचरण महाराजांनी यावेळी महात्मा गांधींनीच भगत सिंह, राजगुरु यांची फाशीची शिक्षा थांबवली नाही, त्यामुळे महात्मा गांधीजी राष्ट्रपिता होऊ शकत नाही असा आरोप केला. त्यामुळे राष्ट्रपिता हवा तर तो छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप आणि सरदार पटेलसारख्या लोकांसारखा असला पाहिजे. त्यांनी राष्ट्राला एकत्र ठेवण्याचे काम केले. परंतु गांधीजींनी देशाची विभागणी करण्याचे काम केले. असे आरोप त्यांनी केला.  कालीचरण महाराजांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ करण्याच्या वक्तव्यावरुन सभागृहात विरोधक आणि सत्ताधारीदेखील आमनेसामने आले होते.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -