घरताज्या घडामोडीPM in US- Day 1 highlights: पाकिस्तानच्या दहशतवाद कनेक्शनवर मोदी - हॅरिस...

PM in US- Day 1 highlights: पाकिस्तानच्या दहशतवाद कनेक्शनवर मोदी – हॅरिस भेटीत चर्चा

Subscribe

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पहिलीच अशी भेट गुरूवारी झाली. या भेटीत पाकिस्तानच्या दहशतवादाच्या कनेक्शनचीही चर्चा झाली. पाकिस्तानात काही दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचेही हॅरिस यांनी या भेटी दरम्यान स्पष्ट केले. त्यांनी इस्लामाबाद येथे कारवाईचेही आदेश दिले आहेत. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या सुरक्षिततेच्या निमित्ताने हे आदेश देण्यात आल्याचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून हे वृत्त देण्यात आले आहे. परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रींगला यांच्या माहितीचा आधार घेत ही बातमी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कनेक्शनमुळे उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सुओमोटो पद्धतीने या विषयातील कारवाईचे आदेश दिल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

पाकिस्तानमध्ये काही दहशतवादी संघटना सध्याही कार्यरत असल्याबाबतच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दिला. मोदी – हॅरिस भेटीत पाकिस्तानच्या दहशतवादाशी संबंधांच्या विषयावरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. क्रॉस बॉर्ड टेररिझमवरही उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पंतप्रधानांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. भारत अनेक दशकांपासून हा दहशतवादाचा फटका बसलेला देश आहे. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानचा दहशतवादी संघटनांना असणारा पाठिंबा आणि सहभाग या मुद्द्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचीही गरज त्यांनी या भेटी दरम्यान व्यक्त केली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यात व्हाईट हाऊस येथे गुरूवारी भेट झाली. इंडो युएस स्ट्रॅटेजिक पार्टनरशीपच्या माध्यमातून जागतिक पातळीवर दोन्ही देशांमधील एकसमान अशा हिताचे विषयही या भेटीत चर्चेला आले. त्यामध्ये लोकशाहीला असलेला धोका, अफगाणिस्तान इंडो पॅसिफिक यासारख्या विषयावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेने कोरोना काळात केलेल्या मदतीसाठीही अमेरिकेचे न विसरता आभार मानले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेने भारताला मोलाची मदत केल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे आभार मानले. त्यासोबतच कमला हॅरिस यांना भारत भेटीला येण्याचेही त्यांनी निमंत्रण दिले आहे.


हेही वाचा – PM Modi US Visit : मोदींनी कोरोनातील मदतीसाठी कमला हॕरिस यांचे मानले आभार, भारत दौऱ्याचेही निमंत्रण

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -