घरदेश-विदेशअब्जाधीश किम कार्दशियनचा घटस्फोट, पतीकडून दहमहा घेणार इतकी पोटगी

अब्जाधीश किम कार्दशियनचा घटस्फोट, पतीकडून दहमहा घेणार इतकी पोटगी

Subscribe

अब्जाधीश असलेली किम कार्दशियन नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेचा विषय असते. कधी तिच्या बोल्डनेसची चर्चा असते तर कधी तिच्या कपड्यांची आणि स्टाईलची. मागील अनेक दिवसांपासून किम आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांच्यातील वैवाहिक वाद चव्हाट्यावर आला होता. यात दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्याही समोर आल्या. मात्र आता दोघांचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला आहे. कार्दशियनने 2021 मध्ये कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आता यावर निकाल देण्यात आला आहे. कान्ये वेस्टला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून किमला तब्बल 1.65 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. यामुळे जगभरातील सर्वात महागड्या घटस्फोटात किम आणि कान्ये यांच्या घटस्फोटाचे नाव घेतले जाते.

किम आणि कान्ये यांना चार मुलं असून त्यांची कस्टडी दोघांकडे सारखीच राहिल, मात्र ही चारही मुलं किमसोबत तिच्या हिडन हिल्स प्रॉपर्टी येथे राहतील. शिवाय मुलं जोपर्यंत 19 वर्षांची होत नाही तोपर्यंत त्यांना किमच्या राहत्या घरापासून 100 किमी अंतरापेक्षा जास्त लांब जाता येणार असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

किम आणि तिचा नवरा हे दोघेही मुलांच्या शिक्षणाचा किंवा त्यांच्या इतर गोष्टींचा समान खर्च करतील.. तसेच दोघेही त्यांच्या नावावरील कर्ज स्वत:च फेडतील, मुलांच्या वाढदिवसालाही दोघांना मुलांसोबत राहता येईल. मुलांच्या हिताचे मोठे निर्णय घेताना दोघांनाही एकमेकांशी बोलावे लागेल.

2012 पासून म्हणजे गेल्या 8 वर्षांपासून किम आणि कान्ये यांच्यात अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. 2013 मध्ये त्यांना पहिलं मुलं झालं. यानंतर दोघांनी मे 2014 मध्ये लग्न केलं. यानंतर त्यांना आणखी 3 मुलं झाली. किमचे हे तिसरं लग्न होतं. मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटात्या बातम्या येत होत्या पण मुलांची आणि प्रोपर्टीची कस्टडी याबाबत दोघांमध्ये एक मत होत नव्हते. म्हणून कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरु होती.


दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीचे नाव; आप नेत्याला 100 कोटी दिल्याचा आरोप

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -