घरभक्तीVastu Tips : घराबाहेर का लावली जाते नावाची पाटी? हे आहेत फायदे

Vastu Tips : घराबाहेर का लावली जाते नावाची पाटी? हे आहेत फायदे

Subscribe

वास्तूशास्त्रात प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक परिणामांसाठी काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत. मात्र या नियमांचा अचूक वापर न केल्यास त्याचा वाईट परिणाम भोगावा लागू शकतो. वास्तूशास्त्रात घरातमध्ये ठेवलेल्या प्रत्येक गोष्टींकडे आपण पुरेपुर लक्ष देतो मात्र आपल्या घराबाहेर लावण्यात आलेल्या नावाच्या पाटी संबंधीत देखील काही खास नियम सांगण्यात आले आहेत. घराबाहेर असलेली नावाची पाटी आपल्याला सकारात्मक उर्जा देण्यास मदत करते.

अनेकजण आपल्या घराबाहेर घराच्या मालकाच्या नावाची पाटी सुद्धा लावतात. मात्र घराच्या बाहेर लावण्यात आलेल्या या पाटीबाबत काही खास गोष्टी लक्षात घ्यायला हव्या यामुळे घरात यश, किर्ती आणि सुख-समृद्धी येते.

- Advertisement -

नावाच्या पाटी संबंधीत या गोष्टी लक्षात ठेवा

  • वास्तू तज्ञांच्या मते, घराबाहेरील नावाची पाटी नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावी, शिवाय त्याचा आकार सुद्धा योग्य असावा, वास्तूनुसार नावाच्या पाटीचा आकार नेहमी आयताकृत असावा.
  • नावाच्या पाटीवर नाव दोन ओळीमध्ये लिहिलेले असावे. याला मुख्य प्रवेश दाराच्या उजव्या बाजूला लावायला हवे.
  • नावाच्या पाटीवर लिहिलेल्या अक्षराची बनावट नीट आणि सहज वाचता येईल अशी असावी.
  • नावाची पाटी नेहमी दरवाजा किंवा भिंतीच्या मध्यभागी लावावी.
  • नावाची पाटी कधीही तुटलेल्या अवस्थेत असू नये.
  • नावाच्या पाटीवर ज्या व्यक्तीचे नाव आहे, त्या व्यक्तीच्या राशीनुसार नावाच्या पाटीचा रंग असावा.

 


हेही वाचा :Vastu Tips : आर्थिक परिस्थितीला त्रासलेले आहात? मग घरामध्ये ठेवा ‘या’ ३ गोष्टी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -