कर्नाटकात भाजपाने 9 वर्षांत कृत्रिम महागाई वाढवल्याने जनतेचे योग्य उत्तर – नाना पटोले

'कर्नाटकात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्षात कृत्रिम महागाई वाढवली. देशातील संपत्ती विकल्या जात आहेत. याचेच उत्तर कर्नाटकाने भाजपाला दिले', अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला.

‘कर्नाटकात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्षात कृत्रिम महागाई वाढवली. देशातील संपत्ती विकल्या जात आहेत. याचेच उत्तर कर्नाटकाने भाजपाला दिले’, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून काँग्रेसने मोठ्या फरकाने आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. (Karnataka Election Results Congress Leader Nana Patole Slams BJP)

“केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला. जनमताला बाजूला सारून भाजपाचे सरकार कर्नाटकात स्थापन केले. या सरकारचे पाच वर्षातील कामकाज पाहिले तर, कर्नाटकातील जनतेवर अत्याचार करणे, मोठ्या प्रमाणात लूट करणे, 40 टक्के कमिशन हे भाजपा करत होते. भ्रष्टाचार हा भाजपाचा खरा चेहरा”, अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला.

“सामाजिक समतोल भाजपाने निर्माण केला आणि ज्या लोकांच्या मदतीवर भाजपा कर्नाटकात सत्तेवर आले, त्याच लिंगायत समजाला वाळीत टाकण्याचे काम भाजपाने केले. त्यामुळे आता लिंगायत समजाने त्यांना त्यांचा इंगा दाखवला. कर्नाटकात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. केंद्रातील भाजपा सरकारने 9 वर्षात कृत्रिम महागाई वाढवली. देशातील संपत्ती विकल्या जात आहेत. याचेच उत्तर कर्नाटकाने भाजपाला दिले”, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

“कर्नाटकातील सुशिक्षित मतदारांनी काँग्रेसला मतदान दिले. तसेच, शिक्षक, शेतकरी यांसह सर्वांचेच मतदान काँग्रेसला मिळेल”, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसचा विजय होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – Karnataka Election Results : काँग्रेस 100हून अधिक जागांनी आघाडीवर; भाजपा पिछाडीवर