घरताज्या घडामोडीया देशात बलात्काऱ्याला नपुंसक बनवण्याची शिक्षा, जगभरात कौतुक

या देशात बलात्काऱ्याला नपुंसक बनवण्याची शिक्षा, जगभरात कौतुक

Subscribe

कझाखस्तानने बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना इंजेक्शन देऊन नपुंसक बनवण्याचा कायदा लागू केला असून त्याची अंमलबाजावणीही सुरू केली आहे.

जगभरात महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. यामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी अनेक कायदेही केले जात आहेत. पण विकृत मानसिकतेमुळे गुन्हेगार कायद्यालाही जुमानत नसल्याचे समोर येत आहे. यामुळे कझाखस्तानने बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना इंजेक्शन देऊन नपुंसक बनवण्याचा कायदा लागू केला असून त्याची अंमलबाजावणीही सुरू केली आहे.

ब्रिटनच्या ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने याची माहिती दिली आहे. त्यानुसार कझाखस्तानमध्ये बलात्काऱ्यांना इंजेक्शन देऊन नपुंसक केले जात आहे. विशेष म्हणजे ज्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. त्या दोषींना कारावासातून सुटल्यावर देखील नपुंसकतेचे इंजेक्शन देण्यात येत आहे.

- Advertisement -

या कायद्यामुळे कझाखस्तानमध्ये खळबळ उडाली असून अनेक जण ही शिक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. तर मीडियावरही अनेक गुन्हेगारही त्यांना देण्यात येणाऱ्या नपुंसकतेच्या इंजेक्शनबदद्ल बोलत आहेत. यात काहीजणांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केला असून त्यांनाही हे इंजेक्शन देण्यात आले आहे.

कझाखस्तानच्या या कायद्याचे जगभरातील देशांनी स्वागत केले असून अशाच कडक कायद्यामुळे महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल असे मत व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -