घरदेश-विदेशभक्तांना गुलाम बनवून चालवायचा सेक्स रॅकेट; स्वयंभू गुरूला १२० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

भक्तांना गुलाम बनवून चालवायचा सेक्स रॅकेट; स्वयंभू गुरूला १२० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

Subscribe

अमेरिकेत एक स्वयंभू गुरू त्याच्या भक्तांना लैंगिक गुलाम बनवून सेक्स रॅकेट चालवायचा. याप्रकरणी या स्वयंभू गुरूला १२० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. ६० वर्षीय स्वयंभू गुरु केनेथ रेनरला उर्वरित आयुष्य तुरुंगात घालवावं लागणार आहे. बचतगट (सेल्फ हेल्प ग्रुप) चालवण्याच्या बहाण्याखाली सेक्स रॅकेट चालवण्याबद्दल आणि महिलांसोबत जबरदस्ती केल्या बद्दल न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. केनेथ Nxivm नावाची संस्था चालवायचा आणि त्या संस्थेचा प्रमुख होता. या संस्थेच्या माध्यमातून केनेथ श्रीमंत आणि प्रभावशाली महिला भाविकांना आकर्षित करायचा आणि त्यांच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवायचा.

पाच दिवसांच्या बचतगट कोर्ससाठी केनेथ भक्तांकडून ५००० डॉलर्स घेत होता. परंतु त्यापैकी बहुतेक भाविकांचं आर्थिक आणि लैंगिक शोषण करायचा. केनेथने या बचत गटामधून डॉस (DOS) स्वतंत्र संस्था स्थापन केली. त्यामध्ये तो महत्त्वाच्या पदावर होता. या सोसायटीमध्ये सर्व सदस्य केनेथ वगळता महिलाच होत्या. संस्थेत, पिरॅमिड प्रकारची रचना होती, ज्यामध्ये स्त्रिया गुलाम आणि स्वामी होत्या.

- Advertisement -

गुलामांना केनेथबरोबर जबरदस्तीने संभोग करण्यास सांगितलं जायचं. त्यांना वैयक्तिक माहिती आणि त्यांचे अश्लिल फोटो दाखवून ब्लॅकमेल केलं जायचं. बऱ्याच स्त्रियांना प्राण्यांसारखं ठेवलं जायचं जेणेकरून इतरांना भीती वाटेल. जून २०१९ मध्ये न्यायालयाने त्याला सात प्रकरणांमध्ये दोषी घोषित केलं होतं. त्याच्यावर लैंगिक रॅकेट चालविणे, लैंगिक तस्करी, खंडणी, गुन्हेगारी कट रचणे आणि १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दरम्यान, आता भक्तांना गुलाम बनवून सेक्स रॅकेट चालवण्याप्रकरणी दोषी घोषित केलं आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -