घरमहाराष्ट्रविनयभंगाचा गुन्हा दाखल केला म्हणून आरोपीनं दिली धमकी; भितीने तरूणीची आत्महत्या

विनयभंगाचा गुन्हा दाखल केला म्हणून आरोपीनं दिली धमकी; भितीने तरूणीची आत्महत्या

Subscribe

दोषी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, आत्महत्या केलेल्या युवतीच्या आई वडिलांची मागणी

अकोल्यातील तेल्हार तालुक्यातील तळेगाव याठिकाणी काही दिवसांपूर्वी एका तरुणीवर विनयभंग करण्यात आला होता. या प्रकारानंतर तरुणीने विनयभंगाची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान तक्रार दाखल होताच पोलिसांना तात्काळ आरोपींना अटक केले आहे.

मृतक तरुणीच्या वडिलांनी विनयभंग झाल्याची तक्रार हिवरखेड पोलिसात केली होती. पीडितेच्या वडिलांनी मुलीवर विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध विनयभंगासह जातीवादी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळतेय. हा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीने या तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना धमक्या देण्यास सुरुवात केली. या धमक्यांना घाबरून पीडित तरुणीने आत्महत्या केली.

- Advertisement -

दरम्यान, मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ८ जणांनाविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत असून या घटनेमुळे तळेगावात तणाव निर्माण झाला होता. आरोपीने केलेल्या कृत्यामुळे तरुण मुलीला जीव गमवावा लागल्याने, युवतीच्या परिवारातील रोष अनावर झाला आहे. दोषी सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी, आत्महत्या केलेल्या युवतीच्या आई वडिलांनी केली आहे.


कंगना VS बीएमसी या वादात पालिकेला ८२ लाखांचा भुर्दंड; अभिनेत्रीचे पालिकेवर ताशेरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -