Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश SDG India Index 2020-21 मध्ये केरळची पुन्हा बाजी, सर्वात वाईट कामगिरीमध्ये बिहारचा...

SDG India Index 2020-21 मध्ये केरळची पुन्हा बाजी, सर्वात वाईट कामगिरीमध्ये बिहारचा क्रमांक

Related Story

- Advertisement -

नीति आयोगाने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (एसडीजी) इंडिया इंडेक्स २०२०-२१ चा निर्देशांक जाहीर केला आहे. या अहवालात केरळ अव्वल स्थानी असून यंदा बिहारची कामगिरी सर्वात वाईट असल्याची नोंद करण्यात आली आहे. विकास लक्ष्यांसाठीचा निर्देशांक हा (एसडीजी) सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय घटकांवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रगतीचे मूल्यांकन करतो. सादर करण्यात आलेल्या या अहवालानुसार केरळने ७५ गुण प्राप्त करून अव्वल राज्य म्हणून आपले स्थान कायम राखले आहे, तर हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू हे ७४ गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहेत. यंदाच्या भारत निर्देशांकात बिहार, झारखंड आणि आसाम हे राज्य सर्वात वाईट कामगिरी करणारे राज्य ठरले आहेत.

- Advertisement -

नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी गुरुवारी इंडिया एसडीजी निर्देशांकाचे तिसरे संस्करण प्रसिद्ध केले. ‘एसडीजी इंडिया इंडेक्सच्या माध्यमातून एसडीजींवर नजर ठेवण्याच्या आमच्या प्रयत्नाचे जगभरात कौतुक करण्यात येत आहे. एसडीजी वर एकत्रित निर्देशांकाचा विचार करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची क्रमवारी लावण्यासाठी हा एक डेटा आधारित उपक्रम असल्याचे कुमार यांनी सांगितले.

हे ५ राज्य आहेत अव्वल स्थानी

  • केरल – ७५ गुण
  • हिमाचल प्रदेश, तमिलनाडू – ७४ गुण
  • आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड – ७२ गुण
  • सिक्किम – ७१ गुण
  • महाराष्ट्र – ७० गुण

सर्वात वाईट कामगिरी करणारी हे ५ राज्ये 

  • छत्तीसगड, नागालँड, ओडिशा – ६१ गुण
  • अरुणाचल प्रदेश, मेघालय, राजस्थान, उत्तर प्रदेश – ६० गुण
  • आसाम – ५७ गुण
  • झारखंड – ५६ गुण
  • बिहार – ५२ गुण

या निर्देशांकाची सुरूवात डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आली होती. देशातील एसडीजीवरील प्रगतीवर नजर ठेवण्यासाठी हे एक प्रमुख साधन बनले आहे. पहिल्या संस्करणात २०१८-२०१९ मध्ये १३ ध्येय, ३९ लक्ष्य आणि ६२ निर्देशकांचा समावेश होता, तर या तिसर्‍या संस्करणात १७ ध्येय, ७० लक्ष्य आणि ११५ निर्देशकांचा समावेश करण्यात आला होता.

- Advertisement -