घरताज्या घडामोडीLive Update: बदलापूर पूर्व MIDC भागातील एका केमिकल प्लांटमध्ये वायू गळती

Live Update: बदलापूर पूर्व MIDC भागातील एका केमिकल प्लांटमध्ये वायू गळती

Subscribe

बदलापूर पूर्व MIDC भागातील एका केमिकल प्लांट मध्ये वायू गळती झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून सदर कंपनी मध्ये जाऊन वायू गळतीचे कॉक बंद करण्यात आले आहे. कंपनीची पाहणी करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आहे. मिळालेल्या माहिती नुसार वायू गळती जास्त विषारी नसून थोड्या वेळात परिस्थिती पूर्ववत होईल. काळजी करू नये फक्त अजून 1 तास घरा बाहेर पडू नये,असे सांगण्यात आले आहे.


ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने मिल्खा सिंग चंदीगडच्या रुग्णालात दाखल झाले असून त्यांना सध्या ICUमध्ये ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

राज्यातील अनलॉकचे टप्पे उद्या सकाळी ९ वाजचा मुख्यमंत्री जाहीर करणार – वड्डेटीवार


गुरुवारी १५ हजार २२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ९१ हजार ४१३ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ०४ हजार ९७४ वर पोहोचली आहे.  (सविस्तर वाचा ) 

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासात ९६१ बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ८९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आज २७ जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. मुंबईत संख्या अँक्टिव्ह रुग्णांची संख्या १६ हजार ६१२ इतकी आहे. (सविस्तर वाचा )


गेल्या २४ तासात धारावीत केवळ एका रुग्णाची नोंद करण्याता आली आहे. धारावी  कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. धारावीत आजच्या घडीला १९ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.


कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन  पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.


 

सर्वसामान्य मुंबईकरांना तूर्तास लोकल प्रवास नाही – विजय वड्डेटीवार (सविस्तर वाचा ) 


राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन हटवला आहे. पाच टप्प्यात अनलॉक आणि लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर वाचा 


राज्यातील लॉकडाऊन आणखीन शिथिल करण्याची शक्यता आहे. याबाबत थोड्याच वेळात मंत्री विजय वडेट्टीवार घोषणा करणार आहेत. सविस्तर वाचा 


केरळमध्ये मान्सून दाखल,आयएमडीची अधिकृत घोषणा


लोकप्रिय गायिक वैशाली माडेने राष्ट्रवादीत केला प्रवेश


दिल्लीतील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या १ हजार ४४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ९२ बरे झाले असून ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती दिल्ली आरोग्य मंत्रालयाचे सत्येंद्र जैन यांनी दिली.


ओबीसी आरक्षणावरून भाजपकडून राज्यभरात आक्रोश आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी देखील भाजप आक्रमक झाली आहे. आंदोलनात ठाकरे सरकारविरोधात भाजप कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद येथे भाजपचे आंदोलन सुरू आहे.


अखिल भारतीय मराठा महासंघाचे बीड जिल्हा युवक अध्यक्ष किशोर गिराम पाटील यांनी माझी बीड येथे भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली.


 

आज सेन्सेक्समध्ये २७२ अंकांची वाढ झाली असून ५२,२१२वर उघडला आहे. त निफ्टी १५,६७२.२५वर आहे.


डोमिनिका कोर्टाने फरारी हिरे व्यापारी मेहूल चोक्सीचा जामीन अर्ज फेटाळला.


मुंबई महानगरपालिकेने काल आज गुरुवारी लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही याबाबत माहिती दिली. पुढील सूचना देईपर्यंत लसीकरण बंद असणार आहे. माहितीनुसार, लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद करण्यात आले आहे.


जगभरात अजूनही कोरोना कहर सुरुच आहे. सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तरी मृत्यूच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत १७ कोटी २४ लाख ७ हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३७ लाख ५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ५० लाख ३७ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्रात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये तीन ग्रामपंचायतींना पुरस्कृत केले जाईल, ज्यांनी प्रत्येक महसूल विभागात कोविड-१९ व्यवस्थापनात चांगले काम केले असेल. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ५० लाख रुपयांच, द्वितीय बक्षीस २५ लाख रुपयांचं आणि तृतीय बक्षीस १५ लाख रुपयांचं दिलं जणार आहे, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -