घरदेश-विदेशपुणे पालिका धक्काबुक्कीप्रकरणी किरीट सोमय्या केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला, पुणे पोलिसांवर कारवाई करण्याची...

पुणे पालिका धक्काबुक्कीप्रकरणी किरीट सोमय्या केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला, पुणे पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

Subscribe

यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी धक्काबुक्की प्रकरणाची माहिती देण्यासाठी आणि दोषीवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी सोमय्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्यावर झालेल्या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिली होती.

पुणे महानगरपालिकेच्या आवारात शिवसैनिकांकडून करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळी सोमय्यांसह इतर 4 खासदारही उपस्थित होते. यावेळी सोमय्यांनी केंद्रीय गृहसचिवांना निवेदन सादर करत पुणे धक्काबुक्की प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, “उद्धव ठाकरे सरकारने संजय राऊत यांच्या बेनाम कंपनीला कोव्हिड सेंटरचे कंत्राट दिले. 100 कोटींचा घोटाळा केला. हे घोटाळे उघड होण्याच्या भीतीने शिवसेनेच्या 100 गुंडांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, यासंदर्भात भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी, गिरीश बापट, रक्षा खडसे आणि मनोज कोटक यांच्यासह केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली आहे. तसेच गृहसचिवांना या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आवाहन केले आहेत.”

किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह मिळून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, त्याचे व्हिडीओ फूटेज सादर केलेत. शिवसेनेचे गुंड मोठं- मोठे दगड मारत होते आणि पोलीस त्यांना मदत करत होते. याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

- Advertisement -

यावेळी भाजपच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील कोव्हिड घोटाळा आणि किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यावेळी सुरक्षाव्यवस्थेत झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची चौकशी करण्याची मागणी गृहसचिवांकडे केली आहे.

यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या धक्काबुक्की प्रकरणाची माहिती देण्यासाठी आणि दोषीवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी सोमय्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्यावर झालेल्या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिली होती. त्याचवेळी त्यांनी गृहमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. किरीट सोमय्या सध्या दिल्लीत आहेत त्यामुळे ते गृहमंत्र्याची भेट घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -