घरदेश-विदेशफेसबुक लाईव्ह करुन मुलीची आत्महत्या

फेसबुक लाईव्ह करुन मुलीची आत्महत्या

Subscribe

कोलकाता येथे एका तरुणीने फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या सोनारपूर भागात मेस्त्री हे कुटुंब राहते. या कुटुंबातील १७ वर्षीय मुलीने फेसबुक लाईव्ह करुन आपले आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे.

नेमके काय झाले?

सोनापूर भागात ही तरुणी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. ही तरुणी १२ वीचे शिक्षण घेत होती. ‘शनिवारी फोनवर बोलणं झाल्यानंतर ती नाराज झाली होती. पण तिला कोणताही प्रश्न विचारला नाही’ असे मुलीची आई संपा मेस्त्री यांनी सांगितले. थोड्या वेळाने मुलगी घराबाहेर पडली आणि सायंकाळच्या वेळी ही तरुणी घरी परतली. काही वेळाने तिची आई कामावरुन घरी आली. तिने आपल्या मुलीला हाक मारली. मात्र मुलीने काहीच प्रतिसाद न दिल्याने अखेर तिने बेडरुमचे दार उघडले असता मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले.

- Advertisement -

आत्महत्या का केली?

तरुणीने आत्महत्या प्रेमप्रकरणातून केली असल्याचे समोर आले आहे. तरुणीचा तिच्या प्रियकरासोबत वाद झाला होता. त्या वादातून तिने आत्महत्येचे पाऊल उचल्याची माहिती तरुणीच्या मैत्रीणीने दिली आहे.

आत्महत्या कशी केली?

तरुणी सायंकाळी घरी परतल्यानंतर तिने सोशल मीडियाच्या फेसबुकवर लाईव्ह करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. याप्रकरणी अधिक माहितीकरता तरूणीचे दोन्ही मोबाईल जप्त करण्यात आले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

सोशल मिडीयातून या आधी घडलेल्या आत्महत्येच्या घटना

या आधी देखील काही तरुणांने सोशल मिडीयातून आत्महत्या केल्याच्या घटना
मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या.

  • कांदिवलीतील एका पंधरा वर्षीय मुलाने चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी त्या मुलाने इंस्टाग्रामवरून माफी मागणारी पोस्ट टाकली होती. हा तरुण सोशल मीडियाच्या आहारी गेला होता. सतत फोनवर बोलणे व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे त्याची आई त्याला ओरडली होती. त्याच रागातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
  • नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करुन गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
  • जळगाव येथील मुबारक तडवी (४५) या शेतकऱ्यांने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी तडवी यांनी आपण आत्महत्या करीत असल्याचा संदेश आणि सुसाईड नोट सोशल मीडियावर टाकली होती.
Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -