घरदेश-विदेशगोव्याच्या किनाऱ्यावर तळीरामांना बसणार दंड

गोव्याच्या किनाऱ्यावर तळीरामांना बसणार दंड

Subscribe

गोव्यात उघड्यावर मद्यपान केल्यास दंड आकारला जाणार आहे. मागील आठवड्यात गोव्यातील विधानसभेत या कायद्याला मंजूरी देण्यात आली आहे. कायद्याअंतर्गत खुल्यावर मद्यपान केल्यास २ हजार रुपायंचा दंड बसणार आहे.

तळीरामांना पार्टी करण्यासाठी आवडीची जागा म्हणजेच गोवा. नवीनवर्ष किंवा इतर वेळी गोव्यात तळीरामांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. गोव्यात उघड्यावर मद्यपान करण्यासाठी परवानगी असल्यामुळे अनेक तळीराम खुल्यावरच मद्यपान करताना दिसतात. कलंगुट, बागा आणि मॉरजिम या किनाऱ्यावर शांतपणे बसून खुल्यावर मद्यपान करताना अनेक तळीराम आढळतात. इतर राज्याच्या तुलनेत गोव्यात मद्य स्वस्त असल्यामुळे अनेक पर्यटकही खुल्यावर मद्यसेवन करताना दिसतात. मात्र यापुढे गोव्यात खुल्यावर मद्यपान केल्यास २ हजारांचा दंड आकारला जाणार आहे. हा कायदा नुकताच गोव्यात विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. या कायद्यानंतर पर्यटकांना किंवा इतर नागरिकांना खुल्यावर  मद्यपान करता येणार नाही. गोवा पर्यटन सरंक्षण व देखरेख कायदा २००१ मध्ये मागील आठवड्यात ही सुधारणा केली आहे.

“राज्य सरकारने घेतलेल्या या नियमाचे आम्ही स्वागत करतो. मात्र याची अंलबजावणी कोण करणार यावर प्रश्नचिन्ह आहे. आम्हाला गोव्यात पर्यटन स्थळे हवेत मात्र त्यांचे सरक्षण करण्याची गरज आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटाकांच्या संख्येत समन्वय ठेवणे गरजेचे आहे. पर्यटक उघड्यावर मद्यपान करून बाटल्या तेथेट टाकून जातात. या बाटल्या काचेच्या असल्यामुळे त्या तुटून कोणालाही ईजा होते. ” – गोवाच्या सर्वोच्च आतिथ्य उद्योग संस्थेचे अध्यक्ष, सॅवियो मेसिआस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -