घरदेश-विदेशLebanon Beirut Blasts : सॅटेलाईट फोटोतून स्फोटातील भीषणता आली समोर

Lebanon Beirut Blasts : सॅटेलाईट फोटोतून स्फोटातील भीषणता आली समोर

Subscribe

लेबनानची राजाधानी बेरूतमध्ये मंगळवारी दोन भयंकर स्फोट झाले. लेबनानच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात ७० जण ठार झाले आहेत तर ४००० जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटाने पुर्ण शहर हादरून गेले. स्फोटानंतरच्या काही सॅटलाईट इमेजेसही समोर आल्या आहेत. त्यामुळे या स्फोटाची भीषणता किती होती याचाही अंदाज येतो. बुधवारी सकाळी विमानातून घेण्यात आलेल्या छायाचित्रात हे भगदाड प्रचंड असल्याचे दिसून आले. हा खड्डा आणि दूर उडालेल्या खिडक्यांचे अंतर, यावरून हा स्फोट किमान २.२ किलोटन टीएनटीच्या स्फोटाइतका असल्याचे शस्त्रविषयक तज्ज्ञ सिम टॅक म्हणाले.

बेरूत

फटाके आणि अमोनियम नायट्रेट या इंधनामुळे बैरुतला हादरवणारा प्रचंड स्फोट झाल्याचे तज्ज्ञांचे मत असून, या स्फोटाच्या दृश्यांमधूनही तसे सूचित होत आहे. शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्त्यांवर दगडमाती आणि उद्ध्वस्त झालेली वाहने विखुरली आहेत. इमारतींचे दर्शनी भाग भग्न झाले आहेत. इमारतींच्या खिडक्या स्फोटाचे केंद्र असलेल्या बैरुतच्या बंदरापासून कित्येक किलोमीटर दूर जाऊन पडल्या. शेतात खत म्हणून वापरल्या जाणाऱ्या अमोनियम नायट्रेट या या रासायनिक संयुगामुळे झालेल्या इतर स्फोटांशी हे दृश्य मिळतेजुळते होते.

- Advertisement -

हेही वाचा –

५०० वर्षांची प्रतीक्षा संपली! देशभरात रामोत्सव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -