घरताज्या घडामोडीLive Update: वाढीव वीज बिलाविरोधात मनसे आक्रमक

Live Update: वाढीव वीज बिलाविरोधात मनसे आक्रमक

Subscribe

वाढीव वीज बिलाविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. परवानगी नसतानाही राज्यभरात मनसेने मोर्चाला सुरुवात केली आहे.


शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या मुलगा विहंग सरनाईक यांना आज सकाळी ११ वाजता ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत देशात ४४ हजार ४८९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५२४ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९२ लाख ६६ हजार ७०६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३५ हजार २२३ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८६ लाख ७९ हजार १३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

आज मुंबईत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने मरीन ड्रायईव्हच्या पोलीस जिमखान्यावर अभिवादन संचलन कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्रीसह अनेक नेते उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहिदांना मानवंदना दिली.


जगात कोरोना व्हायरस दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्डोमीटर आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या ६ कोटी ७ लाख १६ हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी आतापर्यंत १४ लाख २६ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून ४ कोटी २० लाख २८ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात बुधवारी दिवसभरात ६,१५९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,९५,९५९ झाली आहे. राज्यात ८४,४६४ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४६ हजार ७४८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६० टक्के एवढा आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -