घरमहाराष्ट्रवीजबिलावरुन मनसेचा झटका; राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकले मोर्चे

वीजबिलावरुन मनसेचा झटका; राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकले मोर्चे

Subscribe

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. भरमसाठ वीज बिल प्रकरणी मनसेने आज राज्यभरात ‘झटका मोर्चा’चे आयोजन केले असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मात्र अनेक ठिकाणी मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

मनसेने मुंबईत म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निवासस्थान आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी नाकारली. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निवेदन देण्यासाठी परवानगी दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर पुढे काय करायचे ते आमचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे राज ठाकरे यांच्याशी चर्चा करुन ठरवतील, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.

- Advertisement -

ठाण्यात कॅडबरी जंक्शनपासून खोपट सिग्नल आणि टेंभीनाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय समोर मनसे आंदोलन करणार आहे. त्यामुळे ठाणे, पालघर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमा होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मनसैनिक मोठ्या संख्येने येणार असल्याने जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे मनसैनिक जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना रोखण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भावही वाढत असल्यामुळे ठाणे पोलिसांनी जिल्हाबंदीचे आदेश दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून याला मंजुरी देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -