घरताज्या घडामोडीLive Update: मुंबई २४ तासांत ८०४ नव्या रुग्णांची नोंद, १,२९३ रुग्ण कोरोनामुक्त

Live Update: मुंबई २४ तासांत ८०४ नव्या रुग्णांची नोंद, १,२९३ रुग्ण कोरोनामुक्त

Subscribe

मुंबईत गेल्या २४ तासांत ८०४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित आकडा २ लाख ५२ हजार ८७वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात १ हजार २९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत २ लाख २१ हजार ४५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत १९ हजार ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

राज्यात मागील २४ तासात ३ हजार ६४५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ४८ हजार ६६५वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ४३ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये ४० ते ५० जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भागवत कराड यांच्यावरी गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोपी करणारी अभिनेत्री पायल घोष आता राजकारणात… पायल घोष आज, सोमवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपाईमध्ये प्रवेश केला आहे. (सविस्तर वाचा)


देशात गेल्या २४ तासात ४५ हजार १४९ नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून सध्या बाधितांचा आकडा ७९ लाख ९ हजारांवर पोहोचला आहे. तर दिवसभरात ४८० जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावलेल्यांचा आकडा १ लाख १९ हजार १४ झाला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून सध्या ६ लाख ५३ हजार ७१७ रूग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे. (सविस्तर वाचा)


उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची बाधा

‘माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.


होम क्वारंटाइन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोन दिवसांपूर्वी थकवा, अंगात कणकण आणि अशक्तपणा देखील जाणवत होता. अतिवृष्टग्रस्त भागांचा दौरा करून आल्यानंतर अजित पवार यांना थकवा जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांनी करोनाची चाचणीही केली होती. ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतरही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते घरीच होते.


बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारसभेचा आज शेवटचा दिवस आहे. आज बिहार निवडणुकीचा प्रचार प्रसाराची सांगता होणार आहे.


२८ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून पाऊस माघारी परतणार

देशात ऑक्टोबर महिना सुरु झाल्यावर उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. यंदा मात्र उन्हाचे चटके बसायला अद्याप सुरुवात झालेली नाही. गेले चार महिने धुमाकूळ घालणारा पाऊस ऑक्टोबरमध्ये देखील बरसतो आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेले १५ दिवस मोसमी पावसाचा रखडलेला प्रवास तीन दिवसांपूर्वी सुरु झाला. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -