घरमहाराष्ट्रLoksabha 2024: ठाकरेंनी शड्डू ठोकलाच! सांगलीसह 17 जागांची यादी जाहीर; काँग्रेसची कोंडी

Loksabha 2024: ठाकरेंनी शड्डू ठोकलाच! सांगलीसह 17 जागांची यादी जाहीर; काँग्रेसची कोंडी

Subscribe

मुंबई: महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने आज लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 17 जणांना उमेदवारी दिली आहे. या यादीमध्ये काँग्रेस पक्ष ज्या जागांवर आग्रही होता त्या जागांवरही ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने दावा केलेल्या सांगली मतदारसंघात ठाकरे गटात चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. तसंच, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून काँग्रेसला वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्यायची होती. मात्र तिथेही ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. (Loksabha 2024 Uddhav Thackeray has cast a spell List of 17 seats announced including Sangli Congress dilemma)

शिवसेना ठाकरे गटाकडून 17 नावं जाहीर

1) नरेंद्र खेडकर-बुलढाणा
2) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम
3) संजोग वाघेरे पाटील-मावळ
4) चंद्रहार पाटील-सांगली
5) नागेश आष्टिकर-हिंगोली
6) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर
7) ओमराजे निंबाळकर-धाराशिव
8) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी
9) राजाभाऊ वाजे-नाशिक
10) अनंत गीते-रायगड
11) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी
12) राजन विचारे-ठाणे
13) अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य
14) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य
15) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण
16) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य
17) संजय जाधव-परभणी

- Advertisement -

सांगलीच्या जागेवरून वादाची ठिणगी

सांगली मतदार संघ ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे. ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा सन्मानपूर्वक आम्हाला मिळावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे. असं असलं तरीही ठाकरे गटाने सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही नाराजी बोलून दाखवली होती.

मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघावरूनही घमासान

आज सकाळी ठाकरे गटाने थेट उमेदवारच घोषित केल्याने मविआत ठिगणी पडण्याची शक्यता आहे. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून काँग्रेसला वर्षा गायकवाड यांना उभं करायचं होतं. यावर संजय राऊत यांनी खेळी करत आपल्या ट्वीटमध्ये 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु, ट्वीटच्या कॅप्शनमध्ये त्यांनी मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर झाल्याची घोषणा केली आहे. यामुळे आता काँग्रेसची कोंडी झाली आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: Lok Sabha 2024 : शिवसेना ठाकरे गट एकूण 22 जागा लढवणार; संजय राऊतांची माहिती )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -